कैरो : इजिप्तमध्ये दहशतवाद्यांनी एका मशिदीवर केलेल्या बॉम्ब आणि गोळीबार हल्यात १८४ जण ठार झालेत तर १२० हून अधिक लोक जखमी झालेत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा हल्ला आहे.


मशिदीवर आत्मघातकी हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इजिप्तमधील उत्तर सिनई प्रांतात दहशतवाद्यांनी एका मशिदीवर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात १८४ जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताला सरकारच्या अधिकृत मीडियाने दुजोरा दिलाय.


बॉम्ब फेकल्यानंतर अंदाधुंद गोळीबारही


अल-अरिश शहरातील अल-आबेद भागात अल-रावडा ही मुख्य मशीद आहे. या मशिदीला नमाजावेळी टार्गेट करण्यात आले. हल्लेखोरांनी मशिदीवर बॉम्ब फेकल्यानंतर अंदाधुंद गोळीबारही केला, असे एपी या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटलेय.


सुरक्षा अधिकाऱ्यांची तातडीची बैठक


या दहशतवादी हल्ल्याचा निषेध राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी यांनी केला असून त्यांनी तातडीने वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेय. दरम्यान, या हल्ल्याची कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही.