Pitbull Dog Attack : कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र असतो, सर्वात इमानदार आणि आपल्या मालकाच्या संरक्षणासाठी सदैव तप्तर असलेला प्राणी म्हणजे कुत्रा (Dog). आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे अनेकजण आपल्या पाळीव कुत्र्याचा सांभाळ करतात. पण काही जातीचे कुत्रे खूपच धोकादायक असतात. धोकादायक कुत्र्यांमध्ये सर्वात पहिल्या स्थानावर आहे तो म्हणजे पिटबूल. पिटबुल कुत्रे हे सामान्य कुत्र्यांपेक्षा बलवान कुत्रे मानले जातात. त्यांच्याकडे शक्तिशाली आणि मजबूत जबडा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिटबूल कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक जणांना जीव गमवावा लागल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. काही महिन्यापूर्वी लखनऊमध्ये पाळीव पिटबुल जातीच्या कुत्र्याने (Pitbull Dog) मालकीनीचे लचके तोडल्याने 80 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अशीच एक भयंकर घटना एका मॉडेलबरोबर घडली. अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध मॉडेलवर पिटबूलने हल्ला केला. पिटबूलने त्या मॉडेलच्या चेहऱ्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भंयक होता की मॉडेलचा वरच्या ओठाचे तुकडे पडले. 


या मॉडेलच्या ओठावर तब्बल सहा सर्जरी करण्यात आल्या. या सर्जरिमुळे तिच्या चेहऱ्याची ठेवण पूर्णपण बदलली आहे. या मॉडेलने आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले  आहेत. या मॉडेलचं नाव ब्रुकलिन खुरे (Brooklinn Khoury) असं आहे. 


मावस भावाच्या कुत्र्याचा हल्ला
ब्रुकलिन ही 23 वर्षांची असून ती अमेरिकेतली नावाजलेली मॉडेल आहे. घटनेच्या दिवशी ती आपल्या मावस भावाकडे आली होती. त्याच्या घरात त्यांचा पीटबूल हा पाळीव कुत्राही होता. त्याचं नाव डिजल असं आहे. तिघानी पूर्ण दिवस बाहेर फेरफटका मारला त्यानंतर रात्री तिघही घरी आले. घरी आल्यावर ब्रुकलिन आणि तिचा मावस भाऊ आपापल्या रुममध्ये आराम करत होते, त्याचवेळी अचानक पीटबूलने ब्रुकलिनवर हल्ला केला. काही कळायच्या आतच पीटबूलने ब्रुकलिनचा चेहरा आपल्या जबड्यात पडकला होता. तिच्या मावस भावाने कसंबसं पीटबूलला तिच्यापासून दूर केलं. पण हल्ल्यात ब्रुकलिनच्या वरच्या ओठाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता.



ब्रुकलिनला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ला झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी ब्रुकलिनचं एका जाहीरातीसाठी शुटिंग होतं. ब्रुकलिनच्या चेहऱ्यावर तब्बल 6 सर्जरी करण्यात आलं. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर तिच्या चेहऱ्यावरच हसू परतलंय, पण तिचा चेहऱ्याची ठेवण बदलली आहे. 


इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो
ब्रुकलिनने सर्जरीनंतरचे आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. याबरोबरच तीने सर्जरीचं पूर्ण प्रक्रिया सांगणारी एक पोस्टही लिहिली आहे. एका फोटोमध्ये ब्रुकलिनचा वरचा ओठ नसल्याचं दिसत आहे. या फोटोबरोबर तीने पोस्टमध्ये लिहिलंय, मी जेव्हा आरशात बघते तेव्हा माझ्या मनात काय वादळ उठतं हे मी शब्दात सांगू शकत नाही. असं वाटतं मी कोणीतरी अनोळखी आहे. 



काही देशांमध्ये पीटबूल पाळण्यावर बंदी
पिटबूल हे लवकर आक्रमक होतात आणि हल्ला करू शकतात. राग आल्यावर त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. अनेक देशांमध्ये पिटबूल डॉगवर बंदी आहे. इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, न्यूझीलंड, इस्रायल, मलेशिया, बेल्जियम, जपान, जर्मनी, चीन, ब्राझीलच्या काही भागात निर्बंध आहेत. या देशांमध्ये पिट बुलचे संगोपन, व्यापार, प्रजनन यावर बंधने घालण्यात आली आहेत.