25 Year Adult Star In Coma: एडल्ट स्टार एमिली विल्सच्या कुटुंबाने तब्बल 2 महिन्यांनंतर ती कोमातून बाहेर आल्याची माहिती दिली आहे. 11 मार्च रोजी एमिली कोमात असल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली आहे. त्यावेळी फेब्रुवारी महिन्यात एमिलीला आलेल्या हार्ट अटॅकमुळे ती कोमात गेल्याचं कुटुंबाने सांगितलं होतं. आता ही माहिती दिल्यानंतर जवळपास महिन्याभराहून अधिक काळाने कुटुंबाने एमिली कोमातून बाहेर आल्याचं सांगितलं आहे. एमिली ही सुधारणागृहामधील तिच्या रुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर तिला कॅलिफॉर्नियामधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.


सावत्र वडिलांनी दिली माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एमिलीच्या सावत्र वडिलांनी ती आता शुद्धीवर आल्याची माहिती दिली होती. 25 वर्षीय एमिली आता डोळ्यांची उघडझाप करत असल्याचंही तिच्या वडिलांनी सांगितलं. डोळ्यांच्या बुबुळांची हलचाल ती व्यवस्थित करत असून ही सुधारणा तिच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे एमिलीला चेहऱ्यावरील हावभावांमधून संवाद साधता येत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.


बेशुद्धावस्थेत रुममध्ये आढळून आली


मागील महिन्यामध्ये समोर आलेल्या वृत्तानुसार, एमिलीला बेशुद्धावस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं तेव्हा डॉक्टरांनी तिची ही अवस्था अंमली पदार्थांचं अतिसेवन केल्याने झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र वैद्यकीय चाचण्यांनंतर एमिलीच्या शरीरामध्ये कोणतेही अंमली पदार्थ आढळून आले नाहीत. तिला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तिने अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नव्हतं असं चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं. एमिलीचा भाऊ मिचेलनेही तिला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ती अंमली पदार्थांच्या धुंदीत असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. "ओव्हरडोसमुळे तिची अशी अवस्था झाल्याच्या बातम्या समोर आल्या असून याबद्दल आम्ही एवढचं सांगू शकतो की डॉक्टर आणि कुटुंबाच्या माहितीनुसार त्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत," असं मिचेल म्हणाला होता. 


गूढ कायम


एमिलीने आता अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत नाही. मात्र अंमली पदार्थांचं व्यसन लागल्याने तिला सुधारणागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथेच तिला हृदयविकाराचा झटका आलं. मात्र तिला हृयविकाराचा झटका कशामुळे आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिच्याबरोबर नेमकं काय घडलं की तिची अशी अवस्था झाली यासंदर्भातील गूढ अजूनही कायम आहे. ज्या दिवशी एमिली बेशुद्धावस्थेत आढळली त्या दिवशी तिच्या रुममध्ये नेमकं काय घडलं यासंदर्भातील तपास अद्याप सुरु असून 2 महिन्यानंतरही याचा उलगडा झालेला नाही. व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ती सुधारणागृहात राहत होती असं असतानाच अचानक असं काय झालं की तिला हृयविकाराचा झटका आला हे कळू शकलेलं नाही.


नक्की वाचा >> नग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल


सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय


एमिलीचे इन्स्टाग्रामवर 22 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे या फ्लॅटफॉर्मवर अल्पावधित लोकप्रिय झाली. एमिलीचा जन्म अर्जेंटिनामधील असला तरी तिचं संपूर्ण बालपण अमेरिकेतील उथामध्येच गेलं. एमिली अडल्ट इंडस्ट्रीमध्ये पॉर्नस्टार म्हणून काम करायची. मात्र 2 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या 23 व्या वर्षी ती यामधून बाहेर पडली.