नवी दिल्ली : आता एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर अंगावर अक्षरश: काटाच उभा राहतो.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराबाहेर एक परिवार बसलेला आहे. घरासमोरुन गाड्यांची ये-जा सुरु असते. त्याच दरम्यान असं काही घडलं जे पाहून तुम्हालाही धक्काच बसेल.


चीनमधील क्वांजाऊ शहरातील ही घटना आहे. एक भली मोठी व्हॅन चिमुकल्याच्या अंगावरुन जातानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


कुरिअर डिलिव्हरी व्हॅन घरासमोर येऊन थांबते आणि त्याच दरम्यान परिवारासोबत असलेला मुलगा रस्त्यावर जातो. कुरिअर व्हॅन आपलं पाकिट घेऊन घटनास्थळावरुन निघते त्याच दरम्यान तो चिमुकला व्हॅन समोरचं असतो. मात्र, त्या चिमुकल्याला ड्रायव्हरने पाहिलं नाही आणि गाडी त्याच्या अंगावरुन जाते.


गाडीला चिकटूनच चिमुकला होता आणि गाडीचा वेग जोरात नव्हता त्यामुळे गाडीचा धक्का लागताच तो चिमुकला खाली पडला. त्यानंतर गाडी त्याच्या अंगावरुन निघून जाते. सुदैवाने तो चिमुकला सुखरुप आहे.


ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून CGTN ने हा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केला आहे.



वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने प्रसिद्ध केलेल्या २०१६च्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये प्रत्येक वर्षाला ७०० नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. त्यापैकी ६० टक्के नागरिक हे रस्त्यावरुन चालणारे किंवा सायकलस्वार असतात.