अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी, तर १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण
इटली आणि स्पेनमध्ये थैमान घालणारा कोरोना आता अमेरिकेत ही थैमान घालत आहे.
मुंबई : इटली आणि स्पेनमध्ये थैमान घालणारा कोरोना आता अमेरिकेत ही थैमान घालत आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 345 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर येथे 18000 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेत दर मिनिटाला 13 कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.
अमेरिकेत कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 100000 वर गेली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत आता अमेरिकेने चीन, इटली आणि स्पेनला ही मागे टाकलं आहे.
वृत्तसंस्था एएफपीने जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीत, अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 18,000 ने वाढली आहे. 24 तासात येथे 345 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आता जगातील सर्वात जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाचे 1,04,007 रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून 1693 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत जगातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण
या आकडेवारीमुळे अमेरिका आता कोरोनामुळे प्रभावित जगातील सर्वात मोठा देश आहे. अमेरिकेत इटली आणि चीन पेक्षा अधिक रुग्ण आढळले असले तरी अमेरिकेत मृत्यूचे प्रमाण इटलीपेक्षा कमी आहे.
अमेरिकेचे कधीही न झोपलेले शहर न्यूयॉर्क हे आजकाल कोरोनाचे केंद्र बनले आहे. येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आकडेवारीनुसार, न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या या शहरातही इटलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात बेडची कमतरता आहे. सुरक्षा उपकरणे व व्हेंटिलेटरची कमतरता आहे. रूग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या वाढत आहे. लोक आयसीयूमध्ये वाढत आहेत, व्हेंटिलेटरची आवश्यकता सतत वाढत आहे. या आव्हानांच्या दरम्यान कोरोनाशी सामना करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने तयारी वाढविली आहे.