काबूल: Afghanistan Updates : अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळाजवळ (Taliban Terrorists) तिसरा बॉम्बस्फोट ( Kabul airport 3rd blast) झाल्याची माहिती हाती आली आहे. याआधी दोन बॉम्बस्फोट (Kabul Attack) घडवून आणण्यात आले. यात 10 अमेरिकन सैनिकांसह एकूण 64 लोक मारले गेले. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी बॉम्बस्फोटात 52 जण जखमी झाल्याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, भारताने काबूलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. (Kabul Airport Blast)


Abbey Gate जवळ हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानच्या माध्यमांनुसार, पहिले दोन बॉम्बस्फोट काबूल विमानतळाच्या एबी गेटजवळ (Abbey Gate) झाले. या घटनेला दुजोरा देताना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, 'आम्ही काबूल विमानतळाजवळ स्फोट झाल्याचे सांगत आहोत. सध्या या घटनेतील मृतांची माहिती स्पष्ट नाही. तपशील मिळाल्यावर त्याची माहिती सर्वांनसमोर ठेवली जाईल.


ISIS-K ने घडवून आणला बॉम्बस्फोट?



अमेरिकन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हा आत्मघाती बॉम्बर हल्ला होता. या हल्ल्याबरोबरच अॅबी गेटजवळही गोळीबारही करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिस-के 9(ISIS-K) या दहशतवादी गटाने काबूल विमानतळावर हा हल्ला केला. या घटनेनंतर नेदरलँड्सने आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली कारवाई तात्पुरती बंद केली आहे. त्याचबरोबर ब्रिटनने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.


काबूल विमानतळावर झालेल्या या बॉम्बस्फोटाचा परिणाम जगभर दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांची भेट पुढे ढकलली आहे आणि ते त्यांच्या संरक्षण सल्लागारांसह परिस्थितीचा आढावा घेत आहेत. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी आपला इस्रायल दौरा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. काबूल बॉम्बस्फोटानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपला दूतावास अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याची घोषणा केली आहे.


गेल्या एक आठवड्यापासून हजारो अफगाण नागरिक काबूल विमानतळाबाहेर अडकून आहेत. परंतु व्हिसा आणि पासपोर्टच्या अभावामुळे त्यांना विमानतळाच्या आत प्रवेश करता येत नाही. त्याचवेळी, तालिबानने असेही जाहीर केले आहे की कोणत्याही अफगाण नागरिकांना देश सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्यांना त्यांच्या घरी परत जावे लागेल.


अमेरिकेने हल्ल्याचा इशारा दिला होता


काबूल विमानतळाबाहेर या बॉम्बस्फोटाच्या 24 तास आधी अमेरिकेने तेथे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती. 25 ऑगस्ट रोजी अमेरिकेने एक निवेदन जारी केले होते. यात म्हटले होते की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना विमानतळावरुन शक्य तितक्या लवकर दूर जाण्यास सांगण्यात आले होते. विमानतळाबाहेर मोठ्या सुरक्षा धोक्यांचा इशारा अमेरिकेने दिला होता. त्यामुळे सर्व अमेरिकन नागरिकांनी त्वरित अॅबी गेटपासून दूर जावे.


त्याचवेळी, गुरुवारी संध्याकाळी काबूल विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट झाल्यानंतर फ्रान्सने इशारा दिला की तेथे आणखी स्फोट होऊ शकतात. अफगाणिस्तानमधील फ्रेंच राजदूत म्हणाले की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिंताजनक आहे. तिथे आणखी एक स्फोट होऊ शकतो. त्याच्या इशाऱ्यानंतर, विमानतळाबाहेर दुसरा स्फोट झाला.