नवी दिल्ली : मित्रांनी एकत्र विचार केला तर ते  कोणत्याही क्षेत्रात बाजी मारू शकतात. चार मित्रांनी एक 100 वर्ष जुनं भव्य महाल खरेदी केलं. त्या महालाचा कायापालट केला आणि आज त्या महालाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये कमावतात. श्रीलंकेच्या वेलिगामा शहारील हलाला कांडा महालचं आता एका भव्य बंगल्यात रूपांतर झालं आहे. या बंगल्याला लोकांकडून पसंती देखील मिळाली आहे. चार मित्रांनी एकत्र  येवून घेतलेला हा निर्णय अखेर योग्य ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर तुमची ही इच्छा पूर्ण होवू शकते. या भव्य बंगल्यात राहाण्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला एका रात्रीसाठी तब्बल 1 लाख रूपये मोजावे लागणार आहे. 100 वर्ष जुन्या या  हलाला कांडा महालावर 2010 साली इंटीरियर डिझायनर डीन शॉप यांनी नजर पडली. 



तेव्हा त्यांनी आमखी तीन मित्रांना याबद्दल सांगितलं आणि चैघांनी हा बंगला खरेदी करण्याचा निर्णय घेतला.  डीन शॉर्प म्हणाले, 'मी जेव्हा या महालाला पाहिलं तेव्हा यामध्ये काही खास नव्हतं.' त्यांनी 2011 साली जेनी लुईस, रिचर्ड ब्लेसडेल आणि बेंटले डीसोबत 4.3 लाख डॉलर म्हणजे जवळपास 3 कोटी रूपयांमध्ये खरेदी केलं. 



या चार मित्रांनी जुन्या महालासोबत जवळपासची 2 एकर जमीन खरेदी केली. आता हलाला कांडा महालाचं कायापालट करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, हलाला कांडा महालामागे एक इतिहास आहे. 1912 साली श्रीमंत बागान मालकाच्या मुलाने पत्नीला आकर्षित करण्यासाठी हे महाल बांधलं. स्थानिक लोक या महालास जुगनू हिल म्हणून संबोधतात.