मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमधील शीरीमीमेटयेवो विमानतळावर एका प्रवासी विमानाला इमर्जन्सी लॅंडिंग करताना अचनाक आग लागली. या आगीत विमानातील ४१ जणांचा मृत्यू झाला. विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाच्या मागच्या बाजूने अचानक आग लागली. त्यानंतर विमानाने पेट घेतला. दरम्यान, प्रवाशांना लगेच बाहेर काढता आले नाही. त्यामुळे यातच त्यांचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातग्रस्त विमान हे एअरोफ्लोट एअरलाइन्स कंपनीचे होते. मॉस्कोवरुन या विमानाने रशियाच्या म्युरमॅनस्क शहरासाठी उड्डाण केले होते. मात्र, त्याचवेळी विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उड्डाण केलेले विमाना तात्काळ माघारी बोलविण्यात आले. बिघाडानंतर लगेचच हे विमान पुन्हा विमानतळाच्या दिशेने फिरले. या विमानात ७३ प्रवाशांसह ५ क्रू मेंबर होते. ७८ पैकी ३७ प्रवासी या भीषण दुर्घटनेतून बचावले, अशी माहिती रशियाच्या तपास समितीच्या प्रवक्त्याने दिली.



विमानाला मागिल बाजूस आग लागली असली तरी नेमकी कशामुळे ही आग लागली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या विमान अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनेही एक समिती तपास करणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशांनी सांगितले की, खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असावी.