वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या अप्रवासी व्यक्तींबद्दल नकारात्मक वातावरण आहे. तर दुसरीकडे मध्यावधी निवडणुकीमध्ये भारतीय वंशांचे जवळपास 100 उमेदवार रिंगणात आहे. हे सगळे उमेदवार विजय होतील अशी देखील सध्या चर्चा आहे. निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष समोसा कॉकसवर आहे पण युवा भारतीय-अमेरिकी उमेदवारांची इतकी मोठी संख्या त्यांच्यातील वाढती महत्त्वकांक्षा दाखवतो.


समोसा कॉकस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“समोसा कॉकस” हे सध्याच्या काँग्रेसमधील पाच भारतीय-अमेरिकनच्या समुहाला म्हटलं जातं. यामध्ये अमी बेरा, प्रमिला जयपाल, राजा कृष्‍णमूर्ती आणि रो खन्‍ना हे प्रतिनिधी मंडळ आणि कमला हॅरिस सीनेटचे सदस्‍य आहेत. हे सर्व सदस्‍य विरोधी पक्ष डेमोक्रेट पक्षाचे सदस्‍य आहेत. या शब्दाचा3 पहिल्यांदा वापर राजा कृष्‍णमूर्ती यांनी केला. भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 1 टक्के आहे. भारतात अमेरिकेचे माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटलं की, 'अमेरिकेतील राजकारणात भारतीय वंशाच्या व्यक्तींची वाढती संख्या अद्भूत आहे.'


मंगळवारी होणाऱ्या या निवडणुकीत सध्याच्या प्रतिनिधी मंडळाचे सगळे चार भारतीय वंशाचे सदस्य सहज विजयी होतील अशी आशा आहे. यामध्ये 3 वेळा अमेरिकी काँग्रेसचे सदस्य अमी बेरा आणि पहिल्यांदा प्रतिनिधी मंडळावर निवडणून आलेले 3 सदस्य सहभागी आहेत. जे पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे. या निवडणुकीत आणखी 7 भारतीय वंशाचे व्यक्ती मैदानात आहेत.


उद्योगपती शिव अय्यादुरई एकमात्र भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत जे सीनेटसाठी लढत आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे अय्यादुरई यांचा सामना एलिजाबेथ वॉरेन यांच्याशी होणार आहे. जवऴपास 100 भारतीय वंशाचे व्यक्ती मैदानात आहेत.