नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मंगळवारी सकाळी ताजिकिस्तानसह जवळच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगण्यात येत आहे. 7 वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती. भूकंपाचे केंद्रबिंदू ताजिकिस्तानमधील दसहांबेपासून 341 किमी अंतरावर होते. जम्मू-काश्मीरपर्यंत याचे धक्के जाणवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. लोक घराबाहेर पडले. गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के अनेक वेळा जाणवले आहेत. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पहाटे 4.36 वाजता हा भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 होती.


यापूर्वी 9 जून रोजी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 9 जून रोजी सकाळी 8:16 वाजता भूकंपाचे धक्के लोकांना जाणवले. रिश्टर स्केलवर तीव्रता 3.9 होती. भूकंपाचे केंद्रस्थान श्रीनगरच्या 14 किलोमीटर उत्तरेस आणि गांदरबेलच्या दक्षिण-पूर्वेस 7 किलोमीटर अंतरावर होते.


गुजरातमध्येही भूकंपाचे भूकंप


सोमवारी पुन्हा गुजरातमध्ये भूकंपाचा धक्का बसला. दुपारी 12.57 वाजता कच्छ येथे भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर हा भूकंप 4.5 इतका होता. भूकंपाचे केंद्रस्थळ कच्छपासून 15 किलोमीटर अंतरावर होते. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले.


यापूर्वी रविवारी कच्छ येथे 5..5 तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यानंतर भीतीचे वातावरण होते. लोकं घरातून बाहेर होती. भूकंपाचे केंद्रबिंदू कच्छमधील भचाऊ जवळ दहा किमी अंतरावर होते. या भूकंपानंतर कच्छमधील बर्‍याच घरांमध्ये तडे गेले होते.