पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : आपण एखाद्याला मूर्ख म्हणायच्या ऐवजी सहज गाढव (Donkey)आहेस का म्हणतो. जे लोक हास्यास्पद कृत्ये करतात त्यांनाही आपण गाढव म्हणतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का?  की अशा बुद्धिमान प्राण्याला गाढव  (Donkey) का म्हणतात. (6 donkeys detained in pakistan order to present them in court also issued)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाढव हा जिद्दी (Donkey stubborn) स्वभावाचा प्राणी आहे. तो सर्व कामे सहज करतो. गाढवाचा काम करण्याचा स्टॅमिनाही खूप जास्त असतो. यामुळे याला वाळवंटातील प्राणीही (Animals of the desert) म्हणून ओळखला जातो. गाढव त्याच्या लांब कानांमुळे 10 मैल अंतरावरून दुसऱ्या गाढवाचा आवाज ऐकू शकतो. गाढवाची स्मरणशक्तीही (The memory of a donkey) खूप तीक्ष्ण असते. 


गाढव संकटात सापडलाय


जगभरातील गाढवे कदाचित आरामात आणि शांततेत जीवन जगत असतील. जे त्यांना कोणत्याही गुन्ह्याची अजिबात भिती नसते. गाढव(Donkey) हा मानवी चिंतेबद्दल उदासीन आणि गाफील असला पाहिजे, परंतु पाकिस्तानमध्ये (Pakistan) आता प्राण्यांचे जगणेही कठीण झाले आहे. माणसांप्रमाणे त्यांनाही कोर्ट-कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जिथे लाकडाची तस्करी (Timber smuggling) करताना 6 गाढवांना अटक करण्यात आली आहे. या गाढवांवर लाकडाची तस्करी (Timber smuggling on donkeys) तसेच लाकूड माफिया कार्यकर्त्यांना मदत आणि संरक्षण दिल्याचा आरोप आहे.


गाढवकडून लाकडांची तस्करी 


पाकिस्तानात लाकूड माफियांचे टोळके तुफान नाल्यात लाकूड वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर करतात. त्याच वेळी पोलिसांनी धाड टाकून तिथे असलेल्या गाढवाना ताब्यात घेण्यात आलं. आरोपी मात्र पसार झाले. त्यानंतर गाढवांना वनविभागाकडून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले.


देशाच्या जीडीपीमध्ये गाढवांचा मोठा वाटा 


गाढवांना न्यायालयात जाव लागलं असलं तरी गमतीची गोष्ट म्हणजे ताब्यात घेण्यात आलेली गाढव अतिशय हुशार (Donkeys are very smart) आहेत. ही गाढवे स्वत: लाकडाची तस्करी (Timber smuggling) करून एका गावातून दुसऱ्या गावात नेत असतात. कधीकधी त्यांना मदतीची अजिबात गरज नसते. गाढव हा पाकिस्तानमधील उत्पन्नाचा ( income in Pakistan) महत्त्वाचा स्त्रोत आहे. देशाच्या जीडीपीमध्येही त्यांचा मोठा वाटा आहे. देशातील एक मोठा वर्ग पूर्णपणे पशुपालनावर अवलंबून आहे. सुमारे 80 लाख ग्रामीण कुटुंबे पशुपालन करतात. असं असतानाही त्यामुळे लोक त्याला मूर्ख मानतात. आपल्याला मात्र गाढव हुशार असूनही स्वतःच्या फायद्यासाठी शहाणा वाटत नाही.