Earthquake in California Video : अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले असून, या भयंकर भूकंपानंतर इथं त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी 10.44 मिनिटांनी पॅसिफिक समुद्राच्या किनारी क्षेत्रामध्ये असणाऱ्या हम्बोल्ट काऊंटी इथं असणाऱ्या फर्नडेल नावाच्या एका लहान शहरामध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. मोठ्या धक्क्यांनतंरही या भागामध्ये सातत्यानं धरणीकंप जाणवत होते असं स्थानिकाचं म्हणणं. यूनाइटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वे (USGS) नंही कॅलिफोर्नियात आलेल्या या भूकंपाच्या वृत्तावा दुजोरा देत सविस्तर माहिती जारी केली. 


त्सुमामीचा इशारा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलनफोर्नियात 7.0 ते 7.3 रिश्टर स्केलचा भयावह भूकंप आल्यानंतर यंत्रणांनी त्यासंदर्भातील माहिती जारी केली. फर्नडेलपासून जवळपास 100 किमी पश्चिम ते दक्षिण पश्चिमेला 10 किमी (6.21 मैल) खोलवर या भूकंपाचा केंद्रबिंदू आढळला. भूकंपाची एकंदर तीव्रता पाहता या भातामध्ये त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी आलेल्या या भूकंपानंतर कॅलिफोर्नियातील किनारपट्टी भागामध्ये त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. 


प्राथमिक माहितीनुसार सध्याच्या घडीला समुद्रात घातल लाटांची निर्मिती होत नसली तरीही त्सुनामीचा इशारा देत या क्षेत्रातील किनारपट्टी भागामध्ये राहणाऱ्यांनात सतर्क करण्यात आलं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणापासून साधारण 300 किमीपर्यंतच्या अंतरापर्यंत हा इशारा लागू असल्याचं सांगण्यात आलं होतं. कालांतरानं हा इशारा मागे घेण्यात आला असला तरीही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मात्र यंत्रणांकडून दिला जात आहे. 






7.0 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपानंतर सॅन फ्रान्सिस्को आणि ऑकलंडदरम्यान असणारा समुद्रातून जाणारा भुयारी मार्गही बंद करण्यात आला. नागरिकांनी हा भूकंप आला त्या क्षणाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले, जिथं भक्कम घरंही गदागदा हलताना दिसत आहेत, स्विमिंग पूलमधील पाणी भूकंपाच्या हादऱ्यामुळं बाहेर येताना दिसत आहे. दुकानांपासून घरांपर्यंतच्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडत असून, नागरिकांच्या किंचाळण्याचा आक्रोशही यादरम्यान पाहायला मिळाला आणि इथं क्षणात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.