जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) रविवारी कोविड -19 बाबत जाहीर केलेली आकडेवारी चिंताजनक आहे. अवघ्या 24 तासाच तासात जगभरात कोरोनाचे 81 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी 81,153 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर 6,463 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे संकट जगात असल्याने आतापर्यंत 23 लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर या विषाणूमुळे मृतांचा आकडा 1,52,551 वर पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डब्ल्यूएचओने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत या घटनांमध्ये दररोज नवीन रुग्ण आणि मृत्यूदरात घट दिसून येते आहे. रविवारी जगभरात सुमारे 4,००० पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. तर 277 जणांचा मृत्यू झाली. पण तरीही जगात कोरोना विषाणूचा हैदोस सुरुच आहे.


कोरोनामुळे १.१ दशलक्षाहूनही अधिक रुग्णांसह युरोप हा सर्वात गंभीरपणे प्रभावित खंड बनला आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार रविवारी युरोपमध्ये कोविड -19 मुळे मृत्यूंची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली. येथे एका दिवसात 3,737 पेक्षा जास्त मृत्यू झाले. दुसरीकडे, अमेरिका कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देश आहे.


डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अ‍ॅड्नॉम गेबेरियस यांनी जी-20 आरोग्य मंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना संबोधित केले. महासंचालकांनी जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्थांना कोविड 19 च्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी संघर्ष करणार्‍या देशांना त्वरित मदत देण्याचे आवाहन केले.