धक्कादायक... चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची इमारत कोसळली
७० कोरोना पीडित ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
मुंबई : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना व्हायरसने जगात सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तर दुसरीकडे चीनच्या क्वानझोऊ शहरातील एक हॉटेलची इमारत कोसळली आहे. यामध्ये ७० कोरोना रूग्ण ठिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पाळीवर सुरू आहे. तब्बल ८० खोल्या असलेल्या भव्य हॉटेलमध्ये कोरोना व्हायरस पीडितांवर उपचार सुरू होते. या रूग्णांच्या उपचारासाठी ही इमारत तात्पुरती रूग्णालय म्हणून वापरली जात होती.
आता पर्यंत ३३ रूग्णांना ठिगाऱ्याखालून काढण्यात यश आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. त्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या रूग्णांना देखील या तात्पुरत्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, बचाव आणि मदत कार्यासाठी घटनास्थळी १४७ सदस्यांची टीम पाठवली आहे. इमारतीत अडकलेल्या रूग्णांना बाहेर काढण्याचं काम याठिकाणी अद्यापही सुरू आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग गेल्या वर्षी चीनच्या वुहान शहरातून झाला होता.
आतापर्यंत संपूर्ण जगात जवळपास ३ हजार ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील कोरोनाचे रूग्ण अढळले आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुणच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.