Crocodile : मगर (Crocodile) हा अजस्त्र प्राणी पाहिला तरी धडकी भरते. मगरीच्या तावडीत सापडलेला प्राणी अथवा मनुष्य याची जिवंत सुटका होणे जवळपास अशक्य आहे. याच मगरीच्या पोटात बेपत्ता झालेला शेतकरी सापडला आहे. चार दिवसांपासून गायब असलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेह मगरीच्या पोटातून बाहेर काढण्यात आला आहे. मलेशियात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली स्टार आणि मिरर वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 फूट लांबीच्या महाकाय मगरीच्या पोटात एका माणसाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पाहून एकच खबळ उडाली.
चार दिवसांपासून बेपत्ता होता शेतकरी


एक शेतकरी चार दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या परिचयाच्या लोकांनी सर्वत्र त्याचा शोधल घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. अखेरीस 14 फुटांच्या महाकाय मगरीच्या पोटात या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला आहे. 


मगरीचे पोट फाडून शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढला


मगरीचे पोट फाडून शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मगरीचे वजन तब्बल 800 किलो इतके आहे. मगरीने या शेतकऱ्याची शिकार केली असावी असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.  दरम्यान, या शेतकऱ्याला  मगरीने भक्ष्य बनवल्याचे कसे समजले? मगरीचे पोट कुणी फाडले? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


चिपळूण मध्ये मगरींचा मुक्त संचार


चिपळूणमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला होता. या पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. याचा परिणाम वाशिष्टी मधील मगरींवरती झाला. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक मगरी शहरातील विविध भागात वाहून गेल्याचे अनेक प्रकार समोर आले. यात चिपळूण शहराच्या जुना बाजार पुलावर एका व्यक्तीने अश्याच पद्धतीने वाहून आलेल्या मगरीला दोरीच्या साह्याने बांधून फिरवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. खरतर अशा प्रकारे शहरात कुठल्याही भागात वन्य जीव आढळला तर त्याला जेरबंद करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना कळवले जाते. असे असताना स्वतःचा जीव धोक्यात टाकून अमानुष पद्धतीने मगरीला दोरीच्या साह्याने बंधण्या मागचे प्रयोजन काय ? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला होता. 


मुलुंडमध्ये  मगरीची दहशत


मुलुंडमध्ये बिबट्या नंतर एका मगरीने आपली चांगलीच दहशत निर्माण केली होती. मुलुंडच्या योगी हिल परिसरात असलेल्या अॅरिस्टो या इमारतीच्या कन्स्ट्रक्शन साइटवरील खोदलेल्या  खड्ड्यात ही मगर नागरिकांना दिसली होती. घाबरलेल्या नागरिकांनी याची माहिती रॉ या एनजीओला दिल्ली आणि अखेर दहा ते बारा तासांच्या प्रयत्नानंतर या मगरीला पकडण्यात प्राणिमित्रांना यश आले. ही मगर चार फूट चार इंचांची होती. नर जातीची ही मगर असून मार्श क्रोकोडाईल या  प्रजातीची होती. या मगरीची इथून सुटका केल्यानंतर तिला पुन्हा वनविभागात सोडण्यात आले.