आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत एकच व्यक्ती काम असते ती म्हणजे आपला जोडीदार. सुख, दु:खात सगळ्या क्षणी एकमेकांच्या सोबत असणारे पती-पत्नी हे एकमेकांचे सर्वात चांगले मित्र असतात. त्यामुळेच जेव्हा आपला हा मित्र सोडून जातो तेव्हा होणाऱ्या यातनाही असह्य असतात. पती-पत्नीमधील हेच सुंदर नातं दर्शवणारा एक भावूक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या शेवटच्या क्षणीही पत्नीला खंबीर राहण्यासाठी धीर देणाऱ्या पतीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. 


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण उत्तर चीनमधील आहेत. येथे वृद्धापकाळाने 88 वर्षीय व्यक्तीचं निधन झालं होतं. दरम्यान त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधी नातेवाईकाने एक व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये ते आपल्या पत्नीसह संवाद साधताना दिसत आहेत. 64 वर्षांपासून हे दांपत्य एकत्र होतं. 


शिन जिंग जिया यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की "शेवटी आजोबा आमच्यातून निघून गेले. आजी लहान मुलीप्रमाणे रडत आहे. लग्नाच्या 64 व्या वाढदिवसानंतर आजोबा आम्हाला सोडून गेले. जिने आयुष्यभर त्यांची काळजी घेतली तिला सोडून ते गेले आहेत".


या व्हिडीओला लाखो व्ह्यू मिळाले आहेत. या व्हिडीओत ते स्थानिक भाषेत बोलताना दिसत आहेत. शेवटच्या क्षणी ते पत्नीला खंबीर राहण्याचा आणि शोक व्यक्त करत आपले हाल न करण्याचा सल्ला देतात. 


महिलेला अश्रू अनावर


शेवटच्या क्षणांमध्ये त्यांनी पत्नीला एक सल्लाही दिला. ते म्हणाले "जर एखाद्या नातू किंवा नात तुला दु:ख देत असेल तर तू तडजोड करु नकोस". यानंतर कोणीतरी आजींना त्यांना वचन द्या असं सांगतात. व्हिडीओत महिला सतत रडत असल्याचं दिसत आहे. 



काहीवेळाने महिला शांत होते आणि पतीला म्हणते की "मी तुमचा द्वेष करते. मला सोडून जाण्याची इतकी घाई का करत आहात?". यानंतर पती तिचं सांत्वन करत डोकं खांद्यावर टेकवतो. "रडू नकोस. माझी तुला सोडून जाण्याची इच्छा नाही, पण माझ्याकडे पर्याय नाही," असं ते सांगतात. हा व्हिडीओ पाहून नेटकरी फार भावूक होत आहेत.