अमेरिकेने चेतावणी दिल्यानंतर इराणने इस्त्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. इराणने जवळपास 150 मिसाईल्स डागल्याचं बोललं जात आहे. इराणने बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केल्याचं इस्त्रायलच्या लष्कराने सांगितलं आहे. याआधी अमेरिकेने जर इराणने हल्ला केला तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. दरम्यान इराणने जेव्हा मिसाईल्स डागले तेव्हा दुबईला निघालेल्या एका प्रवाशाने विमानातून हे दृश्य कैद केलं आहे. या व्हिडीओत मिसाईल्स इस्त्रायलच्या दिशेने प्रवाश करताना दिसत आहेत. न्यूयॉर्क पोस्टने हा व्हिडीओ रिलीज केला असून यामध्ये त्याची तीव्रता जाणवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर या हल्ल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये इस्त्रायलने आयर्न डोमच्या मदतीने इराणच्या मिसाईल्सला इंटरसेप्ट केलं आणि अनेक मिसाईल्सला हवेतच निकामी केल्याचं दिसत आहे. इस्त्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनिअल यांनी इराणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की, इस्त्रायली लष्कर आपला बचाव करण्य़ासाठी आणि चोख उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. तसंच योग्य वेळी याचं उत्तर दिलं जाईल. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीदेखील इराणला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला आहे. 



'इराणने मोठी चूक केली'


अमेरिकेने आपला दीर्घकाळचा मित्र इस्रायलला पाठिंबा दिल्याने इराणच्या सशस्त्र दलांनी तेहरानच्या विरोधात इस्रायलच्या समर्थकांकडून थेट हस्तक्षेप केल्याने इराणकडून या प्रदेशातील त्यांच्या हितसंबंधांवर हल्ला होईल असं म्हंले आहे. "इराणने आज रात्री एक मोठी चूक केली - आणि ते त्याची भरपाई करेल," असे नेतान्याहू राजकीय-सुरक्षा बैठकीच्या सुरुवातीला म्हणाले.



इस्त्रायली टँकला केलं लक्ष्य


इराणी सरकारी मीडियाच्या हवाल्याने सांगितलं जात आहे की, इराणच्या राज्य माध्यमांनी उद्धृत केलं आहे की IRGC (इराण रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) ने डागलेल्या काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी तथाकथित नेत्झारिम कॉरिडॉरवर असलेल्या इस्रायली टँकर्सना लक्ष्य केलं आहे. नेत्झारिम कॉरिडॉर उत्तर गाझाला दक्षिण गाझापासून वेगळे करण्यासाठी इस्त्रायली आक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात बांधण्यात आला होता. 


इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इराणने एक निवेदन जारी करून हेजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह आणि हमासचे राजकीय नेते इस्माईल हनिया यांच्या मृत्यूचा बदला असल्याचे म्हटलं आहे. इराणने असा इशाराही दिला आहे की, जर इस्रायलने प्रत्युत्तर दिले तर तेहरानची प्रतिक्रिया अधिक विनाशकारी असेल.