लंडन : Unique Stone :जगात विचित्र वस्तू मिळत असतात. त्यापैकी काही या पृथ्वीवरच्या आहेत. तर काही अंतराळातून पृथ्वीवर येत आहेत. मात्र, अनेकांना त्यांची माहिती नसते. अशा स्थितीत वस्तूंच्या किमतीची कल्पना कोणाच्याच घरी नसते. युनायटेड किंगडममधील (United Kingdom)  नॉर्थ वेल्समध्ये (North Wales) अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रातोरात करोडपती बनली आहे.


रात्री आकाशातून पडताना दिसले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द सन'च्या रिपोर्टनुसार, 38 वर्षीय टोनी व्हिल्डिंग हे रेक्सहॅममध्ये (Wrexham) राहतात. एकदा त्यांना आकाशातून ज्वालांचा गोळा पडताना दिसला, त्यानंतर तो गोळा ते शोधू लागले. त्यांनी सांगितले की, एका रात्री मी घराच्या मागे बागेत सिगरेट ओढत होतो, तेव्हा मला माझ्या डोक्यावरी काहीतरी चकमताना दिसले.


वस्तू आगीच्या गोळ्यासारखी दिसली


ते म्हणाले की, यानंतर मी वर पाहिले तेव्हा मला ज्वाळांसह उडणारा चेंडू दिसला. जेव्हा तो माझ्या घराच्या दुप्पट उंचीवर उडताना दिसला. तेव्हा त्याचा वेग वाढलेला होता. तो इतका खाली होता की हवेत फुटबॉलसारखी लाथ मारु शकत होतो. तसेच त्याच्याजवळ जाऊ शकत होतो. 


काही वेळात घराबाहेर पडलो


घरापासून थोड्या अंतरावर पडताच काही सेकंदात तो गोळा विझल्याचे पाहिले. त्या बाजूला आवाज नव्हता. क्षणार्धात सगळं गायब झाल्याचं दिसत होतं, तिथे फक्त धूर दिसत होता.


18 महिने शोध


यानंतर टोनीने त्या वस्तूचा शोध सुरू केला. या दरम्यान 18 महिने उलटले. तथापि, त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि 18 महिन्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतात शोध घेतल्यानंतर त्याला 2lb 4oz आकाराचा उल्का सापडला.


किंमत ऐकून थक्क 


यानंतर टोनीने या दगडाची किंमत किती आहे हे शोधण्यास सुरुवात केली. 100,000 पौंड (1 कोटींहून अधिक) असल्याचे कळल्यावर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.