Hubble Space Telescope : असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते. किंबहुना अशाच अनेक गरजांच्या बळावर आजपर्यंत असंख्य शोध लावले गेले, संशोधनं झाली. प्रकाशाच्या वेगापासून गुरुत्वाकर्षणापर्यंतचे सिद्धांत मांडले गेले. पाहता पाहता विज्ञानानं मानवी आयुष्यात महत्त्वाचं स्थान मिळवलं आणि जग इतकं पुढे आलं की आता अवकाशही जवळच येऊन ठेपलं आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रहतारे आणि तत्सम गोष्टींच्या आकर्षणापोटी मानवानं अवकाशात पाऊस ठेवलं, अभ्यास केला गेला आणि थेट मंगळ, चंद्रापर्यंतही मानव पोहोचलाच. अशा या अवकाशातून एक असं दृश्य काही दिवसांपूर्वी समोर आलं ज्यामुळं संशोधकांनाही हाजरा बसला. खरंतर हे एक अविश्वसनीय दृश्य असून, त्याबाबतचं वर्णन वाचून तुम्हीही थक्क व्हाल. (A planets atmosphere blast captured by Hubble Space Telescope world news)


असं नेमकं झालंय तरी काय? 


अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Hubble Space Telescope नं एक अनपेक्षित घटना टीपली. जिथं पृथ्वीपासून नजीक असणाऱ्या एका लालबुंद ताऱ्यावरील वातावरणात झालेला भयंकर स्फोट नजरेस पडला.  AU Microscopii किंवा AU Mic असं या ताऱ्याचं नाव. हा लाल बटु तारा (red dwarf star) आपल्या सूर्यमालेपासून साधारण 32 प्रकारशवर्शषे दूर असून हे अंतर अवकाशाच्या दृष्टीकोनातून फारसं दुरचं नाही ही बाब लक्षात घेणं महत्त्वाची. सूर्याच्या वयाशी या ताऱ्याची तुलना करायची झाल्यास जिथं सूर्याचं वय 4.6 बिलियन वर्षे असल्याचं सांगितलं जातं तिथंच या ताऱ्याचं वय 100 मिलियन वर्षे असल्याचं म्हटलं जात आहे. या ताऱ्यावर झालेल्या स्फोटातून hydrogen बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 


हेसुद्धा वाचा : Chandrayaan 3 चं लाईव्ह लोकेशन सांगत इस्रोनं म्हटलं, आता पुढील स्थानक 'चंद्र'


 


लाल बटु तारा (red dwarf star) विषयी सांगावं तर, सहसा हे तारे लहान आणि तुलनेनं सूर्याहून थंड असल्याचं निरीक्षणातून समोर येतं. पण, अधिक प्रखर ज्वाला झोत सोडण्यासाठी ओळखले जातात. 


हा फोटो का म्हटला जातोय पृथ्वीचं भविष्य? 


असं म्हणतात की ग्रहमालेमध्ये सध्या असणाऱ्या ग्रहताऱ्यांचंही हेच भवितव्य असणार आहे. पृथ्वीही यासा अपवाद नाही. आजपासून साधारण सात बिलियन वर्षांनी सूर्य त्याच्यात असणाऱ्या हायड्रोजनचं उत्सर्जन करणार असून, त्याचं केंद्रस्थान आणखी उष्ण होणार आहे. पृथ्वीपर्यंत या झळा पोहोचणार असून, पृथ्वीलाही सूर्य गिळंकृत करेल असं अनेक निरीक्षणांतून समोर आलं आहे. सध्या हा फोटो याच भविष्याचं चित्रण करत असल्यामुळं तो प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.