NASA Moon Mission :  चंद्रावर वस्ती निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. अमेरिकेची आंतराळ संस्था NASA चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी विशेष मोहिम राबवत आहे. 2040 पर्यंत चंद्रावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे ध्येय नासाने विश्चित केले आहे. यासाठी आपल्या मून मिशन अंतर्गत चंद्रावर  मानवासाठी घर बांधण्याचा प्लॅन नासाने  तयार केला आहे. तर, दुसरीकडे वैज्ञानिकांनी सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते बनवण्यासाठी विशेष संशोधन केले आहे. यानंतर आता 2030 पर्यंत चंद्रावर रेल्वेचं जाळ विकसीत केलं जाणार आहे. चंद्रावर लुनार रेल्वे विकसीत केली जाणार आहे. याअनुषंगाने नासाने तयारी सुरु केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रावर संशोधन करताना  कार्यक्षम पेलोड वाहतुकीसाठी लुनार रेल्वे प्रणाली विकसित करण्याचीनासाची योजना आहे. NASA ने सोळ मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून नासाने लुनार रेल्वे प्रोजेक्टची अधिकृत माहिती जाहीर केली आहे. चंद्रावर दीर्घकाळ चालणाऱ्या या रोबोटिक लुनार वाहतूक प्रणालीचा माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. 2030 पर्यंत लुनार रेल्वे प्रोजेक्ट प्रत्यक्षात साकार होईल असा अंदाज नासाने वर्तवला आहे. नासाच्या आगामी चंद्र तसेच मंगळ मोहिमांमध्ये आणि रोबोटिक लूनर सरफेस ऑपरेशन्स 2 (RLSO2) सारख्या मिशनसाठी ही लुनार रेल्वे प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.


नेमका कसा आहे लुनार रेल्वे प्रोजक्ट


लुनार रेल्वे प्रोजक्ट कसा आहे ते जाणून घेऊया. चंद्राच्या तळाभोवती, लँडिंग झोन तयार केला जाणार आहे. चंद्रावर विविध प्रयोग तसेच संशोधन करताना सामान मोहिमेच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी  लुनार रेल्वे विकसीत करण्यात येत आहे.  नासाने FLOAT म्हणजेच (Flexible Levitation on a Track) ही प्रणाली तयार केली आहे. 


संशोधकांनी बनवला चंद्रावर रस्ते तयार करण्याचा प्लान


चंद्रावरील माती, धुळीचे कण तसेच दगड यांचा वापर करुन चंद्रावर रस्ते तयार केले जाणार आहेत. चंद्रावर कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. तसेच येथे गुरुत्वाकर्षण देखील अतिश कमी आहे. यामुळे चंद्रावरील माती तसेच धुळीचे कण हवेत तरंगत राहतात. यामुळे चंद्रावर संशोधन करणारे स्पेसक्राफ्ट यामुळे खराब होतात.  सूर्याच्या मदतीने चंद्रावर रस्ता तयार  करण्याचा जबरदस्त प्लान  वैज्ञानिकांनी बनवला आहे.  मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने, बर्लिनमधील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल रिसर्च अँड टेस्टिंगचे प्रोफेसर जेन्स गुन्स्टर यांनी चंद्रावर रस्त्यांची निर्मी करणे शक्य असल्याचे म्हंटले आहे.