काबुल पुन्हा हादरलं, विमानतळ परिसरात रॉकेट हल्ला, दोघांचा मृत्यू
रॉकेट हल्ला एअरपोर्टच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गापासून 800 मीटर ते 1किलोमीटर अंतरावर झाला आहे.
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर (Kabul) आणखी एक मोठा हल्ला झाला आहे. ही घटना काबूल एअरपोर्टजवळ (Kabul Airport) घडली आहे. रॉकेटद्वारे हा हल्ला करण्यात आला आहे. हा रॉकेट निवासी भागात येऊन पडला. वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाजवळ रॉकेट टाकण्यात आला, जिथे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली निर्वासन उड्डाणाचं संचालन आहेत. मात्र अचूक हल्ला करण्यात यश आलं नाही. हा रॉकेट हल्ला एअरपोर्टच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गापासून 800 मीटर ते 1किलोमीटर अंतरावर झाला आहे. (A rocket has just struck a residential area near the Kabul Airport)
अमेरिकेने ड्रोन स्ट्राईक केला होता. या स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. हा रॉकेट एअरपोर्ट जवळी भागात फेकायचा होता. मात्र रॉकेट खाजेह बागरा या निवासी भागातील एका घरावर जाऊन पडला. रॉकेट हल्ल्यानंतर ख्वाजा बुगरा भागात नागिरकांमध्ये एकच धावपळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी झालेल्यांमध्ये महिलांचा आणि लहान मुलांचा समावेश आहे, अंस प्रत्यक्षदर्शीचं म्हणंनं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या हल्ल्यामागे आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी संघटनेचं हात असण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.