पुन्हा एकदा... चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार!
चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सगळा भारत ढवळून निघाला होता... त्याच घटनेची आठवण करून देणारी एक घटना उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को देशात ही घटना घडलीय.
मराकश : चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सगळा भारत ढवळून निघाला होता... त्याच घटनेची आठवण करून देणारी एक घटना उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को देशात ही घटना घडलीय.
मोरक्कोमध्ये एका सरकारी बसमध्ये मानसिकदृष्ट्या असक्षम असलेल्या एका २४ वर्षीय तरुणीवर काही तरुणांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले... आणि धक्कादायक म्हणजे बसच्या ड्रायव्हरसहीत इतर उपस्थित मात्र या तरुणीला मदत करण्याऐवजी या घटनेचा आनंद उपभोगत होते.
पाच-सहा तरुणांनी एका तरुणीला पकडून तिच्या तोंडात कपड्याचा बोळा भरलाय... त्यानंतर एक एक जण तिच्यावर बलात्कार करताना या व्हिडिओत दिसत आहेत... अरबी भाषेत ते या तरुणीला शिवीगाळ करतानाही दिसत आहेत तर बसमधले इतर प्रवासी केवळ बघ्याची भूमिका घेताना या व्हिडिओत दिसतंय.
२० ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याचं समोर येतंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर यावर सर्वच स्थरातून टीका करण्यात येतेय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केल्याचं समजतंय.