Man Do Nose Surgery Watching YouTube: आजकाल लोकं ही सोशल मिडियालाच देव मानतात तसेच तिथे काहीही नवं आलं की लगेगचच तिकडेच काहीतरी आपल्या आयुष्यात अवलंबवण्याचा प्रयत्न करतात. कधी लोकांना त्याचा फायदा होतो तर कधी नुकसान. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला आहे. एका गृहस्थाने आपली नाकाची सर्जनी करून घेण्याचा प्रयत्न केला तोसुद्धा कुठल्या सर्जनकडे नाही तर चक्क युट्यूबवरून... आता या पराक्रमामुळे त्याला सरळ रूग्णालयातच भरती करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता शस्त्रक्रिया हे जेवण बनवण्यासारखे काम नाही जे इंटरनेटवरून शिकून घेता येईल आणि स्वतःच करता येईल. त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांचीच गरज आहे. ब्राझीलच्या एका माणसाने असाच एक अजब प्रकार केला आहे. त्याने घरच्या घरीच युट्यूबवर स्वत:हूनच स्वत:ची शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला आहे.


एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ब्राझीलमधील साओ पाउलो येथील एका व्यक्तीने यूट्यूब व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या नाकाची शस्त्रक्रिया केली. आजकाल यूट्यूबवर वेगवेगळ्या गोष्टींचे ट्युटोरियल्स उपलब्ध असतात. लोकं YouTube वरून स्वयंपाकासाठी कला आणि हस्तकला या गोष्टी देखील शिकतात. परंतु या व्यक्तीने चक्क नाकाची शस्त्रक्रिया कशी करावी यावरील ट्यूटोरियल पाहिले आणि स्वतःच्या नाकाचे ऑपरेशन (राइनोप्लास्टी) करून घेतले. 


कशी केली स्वतःच शस्त्रक्रिया...
हा माणूस हॉस्पिटलमध्ये त्याच्या नाकाची तपासणी करण्यासाठी पोहोचला तेव्हा डॉक्टरांना कळले की त्याची जखम भरलेली नाही आणि ती साफ करणेही आवश्यक आहे. त्या व्यक्तीने स्वतः कबूल केले की YouTube व्हिडिओवरून त्याने आपल्या नाकाच्या शस्त्रक्रिया केली आहे. आपले नाक सपाट कसे करता येईल यासंदर्भात त्यात माहिती दिली होती. नाकाच्या भागाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी या माणसाने अल्कोहोलचा वापर केला तर  नाक सुन्न करण्यासाठी त्याने जनावरांना भूल देणाऱ्या औषधाचा वापर केला. ऑपरेशननंतर त्याने स्वत: विरघळणारा धागा आणि सुपरग्लू वापरून जखम झाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर डॉक्टरांनी त्याची जखम साफ करून वैद्यकीय प्रक्रियेनुसार शस्त्रक्रिया केली.  


अनेकदा लोकांना त्यांच्या शरीराचा अमुक एक भाग आवडत नसतो. विशेषतः चेहऱ्याचा भाग. मग ते प्लास्टिक सर्जरीच्या मदतीने चेहरा सुधारण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यास तयार असतात. अनेक जण शस्त्रक्रियेसाठी परदेशातही जातात. तेव्हा अशी कुठलीही शस्त्रक्रिया तूम्ही करू नका कारण ते तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते.