टोरंटो :  कॅनेडियन सिटी ऑफ मिसिसॉगामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये दोन संशयित घुसले त्यांनी उपकरणांच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला.  या स्फोटानंतर रेस्टॉरंटमधील लोकांची पळापळ झाली. अनेक जण भीतीच्या छाये खाली होती. स्फोटात १५ जण जखमी झालेत, अशी माहिती रॉयटर या वृत्तसंस्थेने दिलेय. १५ जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 कॅनडामधील रेस्टॉरंट हे एका भारतीयाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. टोरंटो शहरातल्या उपनगरीय भागातल्या मिसिसॉगामधील बॉम्बे भेल या रेस्टॉरंटमध्ये स्फोट झालाय. या स्फोटात १५ जखमी पैंकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.



स्थानिक वेळेनुसार रात्री १०.३० वाजता हा स्फोट झाला आहे. परंतु स्फोटाचं कारण अद्याप समजलेले नाही. हा स्फोट यंत्राच्या सहाय्याने करण्यात आला. स्फोट केल्यानंतर दोघा संशयितांनी तेथून पळ काढला, अशी माहिती पीईएल विभागीय पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेय. गेल्या काही दिवसांपूर्वीही टोरंटोमध्ये एका ड्रायव्हरने स्वतःची गाडी गर्दी घुसवली होती. या दुर्घटनेत १० ठार तर १५ लोक जखमी झाले होते.