50 वर्षातील सर्वात भयानक सौर वादळ; ISROच्या Aditya-L1 मध्ये कैद झाला `तो` क्षण
What Is Solar Storm: काहि दिवसांपूर्वी जगातील काही भागांमध्ये नॉर्दन लाइट्स पाहायला मिळाल्या होत्या.
What Is Solar Storm: सूर्याकडून येणारी एक लहर वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. गेल्या 50 वर्षातील सर्वात भयानक सूर्यलाट असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. 11 मे ते 13 मे दरम्यान जिथे दोनदा स्फोट झाला तेथेच ही सौरलाटेचा स्फोट झाल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. या स्फोटाची क्षमता X8.7 इतकी होती. इस्रोचे सूर्ययान म्हणजेच आदित्य एल 1ने सूर्याकडून येणाऱ्या या लाटेचा आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
आदित्य एल 1ने 11 मे रोजी X5.8 इतक्या तीव्रतेची लाट कॅप्चर करण्यास यश आले आहे. इस्रोच्या माहितीनुसार, भारत आणि त्याच्या आसपासच्या परिसरांना सौर वादळाचा तडाखा बसला नाहीये. त्याचा जास्त परिणाम अमेरिका आणि प्रशांत महासागर येथील वरील भागांना बसला आहे. आदित्य एल 1 बरोबरच चंद्रयान-2नेदेखील हे सौरवादळ कॅप्चर केले आहे. इस्रोच्या या निरीक्षणाला नासानेदेखील पुष्टी केली आहे. तर, NOAAच्या स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने 14 मे 2024 रोजी सूर्यातून काही सैरलहरी निघतानाचे निरीक्षणही नोंदवले आहे. या प्रकारच्या लहरी गेल्या कित्येक वर्षांपासून पाहिल्या गेल्या नव्हत्या. यामुळंच पृथ्वीवर रेडिओ ब्लॅकआउट्स होई शकते. खासकरुन मॅक्सिको परिसरात. 2005 नंतरचे हे पहिले सौर वादळ आहे. यामुळं जगभरातील ब्लॅकआउट, उच्च वारंवारता रेडिओ लहरींचा धोका निर्माण झाला होता.
11 ते 14 मे दरम्यान सूर्य ग्रहावर मोठे स्फोट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जास्तकरुन एकाच ठिकाणी हे स्फोट झाले आहेत. ज्याच्यामुळं या आठवड्यात भयंकर सौर तुफान आले आहे. सूर्य ग्रहावर अजूनही धमाके होत आहेत. 10 मे 2024 रोजी सूर्यावर एक खड्डा पाहण्यात आला आहे. याला AR3664 नाव देण्यात आले आहे. त्यानंतर यात मोठा स्फोट झाला आहे. सूर्यातून निघणारी एक लाट मोठ्या वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. ही X5.8 इतक्या तीव्रतेची सौरलहर आहे.
या तीव्र सौरलहरीमुळं सूर्याकडे तोंड असलेल्या पृथ्वीच्या काही भागांवरील हाय फ्रिक्वेंन्सी रेडिओ सिग्नल बंद झाले होते. यावेळी सूर्यावर ज्या ठिकाणी सनस्पॉट बनला आहे तो पृथ्वीपेक्षा 17 टक्क्यांनी विस्तीर्ण आहे. सूर्यावरील तीव्र सौर लहरींमुळं पृथ्वीवरील उत्तर ध्रुव परिसरातील वायुमंडळात मोठी हालचाल झाली. त्यामुळं संपूर्ण उत्तर गोलार्धातील काही ठिकाणी नॉर्दन लाइट्स पाहायला मिळाले.