अफगाणिस्तानात सुरु झालंय `तालिबान राज`; महिला अँकरनं सांगितला `तो` प्रसंग
प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळंच आहे.
काबूल : तालिबाननं अफगाणिस्तानात (Afghanistan) वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर महिलांनी तेथील राष्ट्रपतींच्या निवासाबाहेर आंदोलन केल्याचं दिसून आलं. हे चित्र काहीसं भुवया उंचावणारं होतं. कारण तालिबानच्या वर्चस्वाखाली असताना महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार हेच अंधकारमय वास्तव साऱ्या जगाला धडकी भरवत आहे.
एकिकडे साऱ्या जगासमोर येत एका पत्रकार परिषदेमध्ये तालिबानकडून (Taliban) महिलांचे हक्क अबाधित राहतील अशी ग्वाही दिली. शरिया कायद्याच्या चौकटीत राहून महिलांना शिक्षण घेता येईल आणि नोकरीही करता येईल याची हमी दिली. पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळंच आहे.
टेलिव्हीजन अभिनेत्रीच्या जवळची व्यक्ती Afganistan मध्ये; भयावह वास्तव ऐकून होईल काळजाचं पाणी
सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं Shabnam Dawran नावाची महिला टीव्ही अँकर तिच्या नोकरीच्या ठिकाणी गेली असता तिथं तिला प्रवेश नाकारला गेला. शासन बदलल्यामुळं प्रवेश नाकारल्याचं कारण तिला देण्यात आलं. तिला ऑफिसमध्ये जाण्यापासून रोखत घरी जाण्यास सांगण्यात आलं.
एकिकडे महिलांचे हक्क अबाधित राहणार असल्याचं सांगणाऱ्या तालिबान राजमध्ये दुसऱ्या बाजूला महिलांना आतापासूनच नोकरीच्या ठिकाणी प्रवेश नाकारला जाणं ही घटना पाहता नेमकं सत्य काय आणि अफगाणिस्तानाच महिलांचे नेमके कोणते हक्क अबाधित राहणार यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.