मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तलिबानची सत्ता स्थापन झाल्यापासून रोज धक्कादायक बातम्या समोर येत आहे. काबूलमधील सकाळ रोज नव नव्या दहशतीने सुरू होत आहे. सोमवारी सकाळी काबूल पुन्हा रॉकेट हल्ल्याने हादरले आहेत. असं असताना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. पण हाच आवाज दाबण्याचा प्रयत्न तालिबानींकडून केला जात असल्याचं म्हटलं जात आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानातील पत्रकार हिझबुल्लाह खान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत अफगाणिस्तानातील एका वृत्त वाहिनीतील आहे. जेथे स्टुडिओत मुलाखतीच्यावेळी तालिबानी शस्त्रांसह उभे आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हेच का पत्रकारीतेतील स्वातंत्र्य? असा सवाल विचारला जात आहे. 42 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. तालिबान तसेच किमान आठ तालिबान लढाऊंचे निवेदन वाचत आहेत.



शरीफ यांनी ट्विट केले, “सशस्त्र तालिबानी लढाऊ त्याच्या पाठीमागे उभे आहेत, अफगाण टीव्हीच्या पीस स्टुडिओ राजकीय वादविवाद कार्यक्रमाचे इंटरव्ह्यू घेणारे म्हणतात की इस्लामिक अमिरात जनतेने त्यांना सहकार्य करावे आणि घाबरू नये. अशी इच्छा आहे. ट्वीट करा या कार्यक्रमाचे नाव परदाज आहे आणि नंतर मुलाखतकाराने एका तालिबानी सेनानीची मुलाखत घेतली.  हा व्हि़डीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 'मुक्त पत्रकारितेची तालिबानींची व्याख्या', हीच का खरी पत्रकारिता अशा आशयाचे कमेंट यावर येत आहेत.


हे अवास्तव आहे. तालिबानी अतिरेकी बंदुकीसह या स्पष्टपणे भयभीत टीव्ही होस्टच्या मागे उभे आहेत आणि त्याला असे सांगण्यास भाग पाडत आहेत की #अफगाणिस्तानच्या लोकांना इस्लामिक अमिरातीपासून घाबरू नये. तालिबान स्वतः लाखो लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. हा फक्त दुसरा पुरावा आहे, अशा आशयाचे ट्विट होत आहेत.