Afghanistan Crisis : तालिबानमुळे महिला हक्कांसाठी तर विद्यार्थी शिक्षणासाठी चिंतेत
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानची सत्ता स्थापन झाल्यामुळे महिला आणि विद्यार्थ्यांना मिळतील त्यांचे हक्क?
काबूल : अफगणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे तेथील अनेक नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तेथील महिला त्यांच्या अधिकारांसाठी चिंतीत आहेत. तर विद्यार्थी आपलं शिक्षण तर थांबरणार नाही ना? असा प्रश्न अफगणास्तानमधील विद्यार्थ्यांना सतावत आहे. पूर्वी जेव्हा तालिबानी सत्तेत होते तेव्हा त्यांनी महिलांना फक्त नोकरी आणि शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही तर घरा बाहेर पडण्यावर देखील सक्ती केली. महिला फक्त पुरूषांसोबत बाहेर फिरू शकतील असा फतवा तालिबानने काढला होता.
आता पुन्हा महिला आणि विद्यार्थ्यांना गुलामीचं आयुष्य जगावं लागेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अफगाणिस्तानमधील एक 17 वर्षीय तरूणी म्हणते, 'माझा जन्म 2004 साली झाला. त्यामुळे मला माहिती तालिबान महिलांसोबत कसं व्यवहार करतं. मी माझ्या भविष्यामुळे चिंतीत आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की तालिबान महिलांना घरात कैद करतात. '
दरम्यान, गेल्या दोन दशकांपूर्वी अफगान सरकार आणि अमेरिकी नेत्यांनी देशवासियांनी शांती आणि समृद्धीसह महिलांना त्यांचे अधिकार मिळतील असं वचन दिलं होतं. त्यानंतर स्थिती सुधारली देखील होती. पण आता पुन्हा एकदा तालिबानने ताबा मिळवल्यानंतर महिला सर्वाधिक चिंतेत आहेत.
सांगायचं झालं तर, आपलं देश सोडण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी तेथील नागरिकांनी विमानतळावर एकचं गर्दी केली. त्यानंतर तलिबानींना काबूल विमानतळावर गोळीबार केला. परिस्थितीची चाहूल लागताचं अफगाणिस्तानमधील नेत्यांनी देश सोडला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीसाठी जबाबदार कोण? असा प्रश्न अफगाण नागरिकांनी उपस्थित केला आहे.