नवी दिल्ली : Afghanistan Updates : अफगाणिस्तानचा (Afghanistan ) तालिबानकडून (Taliban News) पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती (Afghanistan Crisis) निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. देश सोडून जाण्यासाठी अनेक नागरिकांची धडपड सुरु आहे. काबूल विमानतळावर (Kabul airport) मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे. गर्दीमुळे भारतीयांना (Indian) विमानतळात जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकले आहेत.


तालिबानने भारताच्या वाणिज्य दूतावासात केला प्रवेश, ISI ने दिले होते निर्देश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकले असून ते सहा तासांपासून मोठ्या गर्दीमुळे विमानतळाबाहेर आहेत. C-17 ग्लोबमास्टर हे भारतीयांच्या प्रतिक्षेत आहे. अफगाणिस्तानातून या वेळची सर्वात मोठी ही बातमी आहे. विमानतळावर प्रवाशांची तुफान गर्दी आहे. त्यामुळे या भारतीयांना विमानतळात जाताच येत नाही.


Kabul वर ताबा मिळवल्यानंतर कोणताही Taliban नेता सत्तेसाठी पुढे का आला नाही?



भारतीय नागरीत गेल्या 6 तासांपासून विमानतळाबाहेर ताटकळल आहेत. या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतीय हवाईदलाचं C-17 ग्लोबमास्टर हे विमान काबुल विमानतळावर दाखल झाले आहे. मात्र, भारतीय नागरिक विमानतळाच्या आत येऊ शकलेले नसल्याने विमानाचे उड्डाण रखडलेले आहे. काबूळ विमानतळावरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.


दरम्यान, अफगाणिस्तानात निवडणुकांसाठी सध्या योग्य वेळ नाही, असे तालिबानने म्हटले आहे. आमची प्राथमिकता ही सरकार स्थापन करण्याची असेल असं तालिबानने म्हटलंय. तसंच नवं संविधानही तालिबानी लिहिणार आहेत. अफगाणिस्तानात तात्काळ एक सर्वसमावेशी सरकार स्थापन केलं जाईल असं तालिबानने म्हटले आहे.