मुंबई : अफगाणिस्तान राष्ट्रीय टीमचा फुटबॉलर जाकी अनवारी याचं गुरूवारी निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबुल एअरपोर्टवर अमेरिकेतील विमानातून पडून झाकी अनवारीचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती गुरूवारी एरियाना न्यूज एजन्सीने दिली आहे. एरियाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील विमान बोइंग सी-17 मधून पडून आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाकी अनवारी हा अफगाणिस्तानचा युवा फुटबॉलर होता. त्याचा मृत्यू सोमवारी 16 ऑगस्ट रोजी विमानातून कोसळून अपघाती मृत्यू झाला आहे. झाकी अमेरिकेतील सैन्य विमानातून खाली कोसळला होता. झाकीच्या मृत्यूची माहिती अफगाण राष्ट्रीय फुटबॉलटीमच्या फेसबुक अकाऊंटवरून 18 ऑगस्ट रोजी देण्यात आली. अनवारी त्या हजारो अफगाणिस्तानांपैकी एक होता जे सोमवारी हामादि करजई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर पोहोचले होते. 



विमानात बसण्यासाठी एकच गोंधळ उडाला. तालिबानी लोकांच्या भितीने अनेकजण विमानाच्या चाकांवर बसले. 16 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला. यावेळी विमानावर बसलेल्या तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये झाकीचा देखील समावेश होता. जे विमानाच्या चाकावर बसले होते. अनवारी अफगाण राष्ट्रीय युवा फुटबॉल टीममधून खेळत असे.  


16 ऑगस्ट रोजी हामिद करजई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील व्हिडीओ अंगावर काटा आणणारे होते. अमेरिकेतील वायुसेनेचं विमान जसं टेकऑफ घेत होतं तशी लोकांची रनवेवर गर्दी वाढली होती. विमान उडायच्या आधी अनेकजण विमानावर, विमानाच्या पंखांवर आणि विमानाच्या चाकांवर बसले. विमानाने जेव्हा उंची गाठली तेव्हा लोकांनी आपलं संतुलन बिघडलं यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.