अफगाणिस्तानातील ‘बच्चा बाजी’ परंपरा काय आहे? ज्यामध्ये लहान मुलं करतात घृणास्पद काम
बरीच मुलंह या अशा लोकांच्या तावडीतून बाहेर आली आहेत आणि त्यांनी त्यांच्या वेदना सांगितल्या आहेत.
काबूल : तालिबानने अफगाणिस्तामधील बहुतांश भाग आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे विमानतळापासून ते रस्त्यांपर्यंत सर्वत्र तालिबानचे नियंत्रण आहे. असे म्हटले जात आहे की, तालिबानच्या येण्याने अफगाणिस्तानचे चित्र बदलेल आहे, त्याचबरोबर महिलांचे स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेतले जाण्याची शक्यता आहे. परंतु सर्व वाईट परंपरा तालिबानच्या येण्यामुळेच अफगाणिस्तानात येतील असे नाही, तर काही वाईट परंपरा आधीपासूनच अफगाणिस्तानमध्ये सुरू आहेत. यातील एक म्हणजे 'बच्चा बाजी'.
‘बच्चा बाजी’ म्हणजे मुलांची सट्टेबाजी आणि ही एक अशी परंपरा आहे, ज्याला जगभरातून विरोध केला जात आहे. अफगाणिस्तानबरोबरच पाकिस्तानमध्येही मुलांच्या सट्टेबाजी सुरू आहे आणि पाकिस्तानातूनही याविषयी बातम्या येत राहतात. अशा परिस्थितीत, हे जाणून घेणे आवश्यक आहे की, याला का विरोध केला जात आहे? ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.
‘बच्चा बाजी’ म्हणजे काय?
‘बच्चा बाजी’ हा एक प्रकारची प्रथा आहे, ज्यात 10 वर्षे वयाच्या मुलांना श्रीमंत लोक पार्ट्यांमध्ये नाचवतात. हे मुलांच्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्यासाठी नाही, तर यामुळे मुलांवर अत्याचार होतात. या प्रथेमध्ये मुलांना मुलींचे कपडे घालून आणि मेक-अप लावून या पार्ट्यांमध्ये नाचवतात. असे म्हटले जाते की, हे डान्स केल्यानंतर पुरुष या मुलांवर बलात्कार करतात आणि त्यानंतर ही मुले या दलदलीत अडकतात. या प्रथेमध्ये स्त्रियांनाबरोबर देखील गैरवर्तन केली जाते, ज्यामुळे या प्रथेवर टीका केली गेली आहे.
बरीच मुलंह या अशा लोकांच्या तावडीतून बाहेर आली आहेत आणि त्यांनी त्यांच्या वेदना सांगितल्या आहेत. तसे, अफगाणिस्तानमध्ये समलैंगिकताला गैर-इस्लामिक आणि अनैतिक मानली जाते आणि तेथे ही प्रथा अगदी सामान्य आहे, ज्यात मुलांवर बलात्कार होतात.
या मुलांना इथे 'लौंडे' किंवा 'बच्चा बेरीश' असेही म्हटले जाते आणि ते मुलींसारखे कपडे घालून नाचतात. 'द डान्सिंग बॉयज ऑफ अफगाणिस्तान' या नावाने एक डॉक्यूमेंट्री ही बनवण्यात आली आहे.
ही मुलं कुठल्या ना कुठल्या पार्टीला जातात आणि लोकांचं मनोरंजन करतात. त्यांना या कामासाठी फक्त कपडे आणि अन्न मिळते. खरेतर गरिबीच्या अवस्थेत मुलांना हे काम करण्यास भाग पाडले जाते. ज्या लोकांना निट खायला मिळत नाही, ते लोकं या प्रथेला आधार बनवतात आणि आपले दिवस काढतात.
याप्रथेमध्ये सहभागि झालेल्या मुलांचे अपहरण करून त्यांची विक्रीही केली जाते. एक प्रकारे, मुले एका श्रीमंत व्यक्तीला विकली जातात आणि ते लोक त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा वापर करतात.