Kabul Explosion: सीरिअल बॉम्बस्फोटाने काबूल हादरलं, 5 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती
अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) सीरिअल बॉम्बस्फोट
Kabul Explosion: अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) झालेल्या सीरिअल बॉम्बस्फोटांमध्ये (Serial Bonb Blast) किमान 5 शाळकरी मुलं ठार झाल्याची माहिती आहे. पश्मिची काबूलच्या दश्त-ए-बरची भागात एका शाळेसमोर एकामागून एक दोन स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोट झाला तेव्हा विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत होती. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाने या स्फोटांना दुजोरा दिला आहे. मात्र, मृतांचा अधिकृत आकडा अद्याप आलेला नाही.
एक स्फोट मुमताज ट्रेनिंग सेंटरजवळ झाला तर दुसरा स्फोट अब्दुल रहीम शहीद हायस्कूलसमोर झाला. स्फोट झाला तेव्हा मुलं शाळेतून बाहेर पडत होती. काबूलमध्ये एकूण तीन स्फोट झाल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहीम शहीद हायस्कूलमध्येच दोन स्फोट झाले. अब्दुल रहीम शहीद हायस्कूल ही पश्चिम काबुलमधील सर्वात लोकप्रिय शाळांपैकी एक आहे. या शाळेत शिकणारी सर्व मुलं अल्पसंख्याक हजारा समाजातील होती.
तालिबानच्या राजवटीत हजारा समाजाच्या लोकांवर यापूर्वी अनेक हल्ले झाले आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.