काबूल: अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तिथली परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत आहे. अफगाणिस्तान देशावर पुन्हा तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळवला. त्यामुळे अफगाणिस्तानत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारताचं मिशन एअरलिफ्ट वेगात सुरू आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना घेऊन वायुदलाची विमानं येत आहेत. तर दुसरीकडे एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तवाहिनीची पत्रकार अफगाणिस्तानातून लाईव्ह करत असताना तिच्या मागे लाईव्ह गोळीबार सुरू असल्याचा आवाज येत आहे. गोळीबारचा आवाज सुरुवातीला थोडा वेळ थांबून आणि नंतर वेगाने वाढताना ऐकू येत आहे. या आवाजावरून तालिबानी किती क्रूरपणे गोळीबार करत असतील याची कल्पना येईल. या महिला रिपोर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


तालिबान्यांना अफगाणवर कब्जा केल्यानंतर आपली प्रतिमा बदलण्यासाठी वेगवेगळी विधानं केली. मात्र अफगाणिस्तानसह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांना त्यांचा खरा चेहरा माहिती होता. पुढच्या काही तासांत तालिब्यांचं खरं रूप जगासमोर आलं. त्यांनी महिलांवर निर्बंध लावले. काबूल विमानतळावर एकदा नाही तर दोन वेळा निष्पाप लोकांचा जीव घेण्यासाठी गोळीबार केला. 



अफगाणिस्तानमधील या भीषण परिस्थितीचं वार्तांकन करण्यासाठी पोहोचलेल्या रिपोर्टरच्या मागे वेगानं गोळीबार होत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. तर तिच्या मागे लोक गोळीबार होत असल्याचं पाहून सैरावैरा पळत असल्याचं दिसत आहे. त्यांनी न डगमगता केलेलं हे रिपोर्टिंग खरंच धाडसी आहे. या महिला रिपोर्टरला युझर्सनी सिंहाची उपमा दिली आहे.