काबुल: अफगाणिस्तानच्या पंजशीर भागावर कब्जा मिळवणं तालिबानला अजूनही जमलं नाही. तिथल्या नागरिकांनी तालिबान्यांना पळताभुई थोडी केली होती. आता पुन्हा एकदा तालिबान या घाटीवर आपला कब्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा तालिबानी आणि तिथल्या रहिवाशांची चर्चा सुरू आहे. सीझफायरवर त्यांचा अखेर करार झाला आहे. पण पंजशीरवर कब्जा मिळवणं एवढं का कठीण आहे? तालिबानला हा परिसर आपल्या मुठीत का ठेवायचा आहे याची काही कारण आज आपण जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानातील पंजशीर हा परिसर भौगोलिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर काबुलच्या दक्षिण पश्चिम पासून ते उत्तर पूर्वेपर्यंत ही घाटी पसरली आहे. 120 किमीपर्यंत हा परिसर आहे. इथे साधारण 1.5 ते 2 लाख लोक राहतात. चारही बाजूने पाणी आणि उंच डोंगर त्यामुळे हे डोंगर जणू तिथल्या नागरिकांचं रक्षणच करतात. तिथल्या लोकांसाठी हे प्राकृतिक सुरक्षा कवच म्हटलं जातं. 


या परिसरात केवळ एकच रस्ता तेही डोंगरांमधून वाट काढत गेलेला दिसतो. काबुलपासून 3 तास दूर हे पंजशीर घाटी आहे. कठीण रस्ते आणि उंच डोंगर यामुळे या परिसरावर कब्जा मिळवणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे. तालिबानकडून या भागावर कब्जा मिळवण्याचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. मात्र नॉर्दर्न अलायन्स तालिबान्यांना रोखण्यात यशस्वी ठरत आहे. 


अहमद शाह मसूद यांचे पूत्र अहमद अहमद मसूद नॉर्दर्न अलायन्सचं नेतृत्व करत आहेत. पंचशीर घाटीमध्ये तालिबान्यांविरोधात लढण्यासाठी लोक एकजूट झाले आहेत. पंचशीर इथले लोक हे अफगाणिस्तानमधील लोकांच्या एक छोटासा भाग आहे. आम्ही पूर्ण देशासाठी उभे राहिलो आहोत. या सगळ्या गोष्टी आता तालिबानने लक्षात घेऊन चारही बाजूने पंचशीरला वेढा दिला आहे. 


या भागावर तालिबानसाठी कब्जा मिळवणं महत्त्वाचं आहे याचं कारण म्हणजे भौगोलिक परिस्थिती, व्यापार आणि सुरक्षा या सगळ्याच अर्थानं फायदेशीर ठरू शकणार आहे. पंजशीरमधील नागरिक आता या लोकांशी कसा लढा देऊन तालिबान्यांना पळवून लावणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी झालेल्या वादामध्ये तालिबानचे 300 सैनिक मारण्यात पंजशीर इथल्या नागरिकांना यश मिळाल्याचंही सांगण्यात आलं होतं.