काबूल: Afghanistan Updates : अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतलेला तालिबान (Taliban) हळूहळू त्याचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात करीत आहे. त्यांचे दहशतवादी आता सामान्य लोकांवर अत्याचार (Afghanistan Crisis) करत आहेत तसेच परराष्ट्र दुतावासांवर कारवाई करत नुकसान पोहोचवत आहेत.


तालिबानने भारतीय वाणिज्य दूतावासात प्रवेश केला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबानी दहशतवाद्यांनी (Taliban terrorists) बुधवारी कंधार (Kandahar) आणि हेरात (Herat) प्रांतातील रिकाम्या भारतीय दूतावासात प्रवेश केला. त्याने तिथे सरकारी कागदपत्रे आणि संगणक शोधले. यानंतर त्यांनी वाणिज्य दूतावासात उभी असलेली भारतीय वाहने आपल्यासोबत घेतली. ती वाहने त्यांच्याबरोबर नेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यापैकी अनेक वाहने ही बुलेटप्रूफ होती.


काबूलवर ताबा मिळवल्यानंतर कोणताही तालिबानी नेता सत्तेसाठी पुढे का आला नाही?


ISI च्या सूचनेनुसार कारवाई


पाकिस्तानच्या आयएसआयच्या सूचनेवर तालिबानने ही कारवाई केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वास्तविक आयएसआय तालिबानचा प्यादे म्हणून वापर करून भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचवू इच्छित आहे. भारतीय वाणिज्य दूतावासात प्रवेश करण्याबरोबरच तालिबानी अतिरेक्यांनी जवळच्या घरांवर छापा टाकून अफगाण सैनिकांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.


राष्ट्रपती गनी यांनी देश सोडला 


रविवारी तालिबान दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह अफगाणच्या बहुतेक भागांवर कब्जा केला आहे. काबूलवर तालिबानच्या हल्ल्याने, राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह बहुतेक नेते, अधिकारी आणि लष्करी कमांडर देश सोडून गेले आहेत. तेव्हापासून तालिबानी दहशतवादी त्यांचे नियम आणि कायदे तेथे लादण्याचा प्रयत्न करत आहेत.