काबूल : तालिबानच्या दहशतीपासून वाचण्यासाठी अफगाणिस्तान सोडण्याच्या आशेने काबूल विमानतळावर पोहोचलेले लोक उपासमारीने त्रस्त आहेत. विमानतळाबाहेर खाण्या-पिण्याच्या वस्तू जास्त किंमतीत विकल्या जात आहेत. एवढेच नाही तर दुकानदार अफगाणिस्तानमधील चलनाऐवजी डॉलरची मागणी करत आहेत. अमेरिकन आणि ब्रिटीश सैनिक अफगाणांना मदत करत असले तरी त्यांना प्रत्येक व्यक्तीला अन्न आणि पाणी मिळणे देखील कठीण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबूल विमानतळावर एका पाण्याच्या बाटलीसाठी 40 डॉलर म्हणजे जवळपास 3 हजार रूपये मोजावे लागत आहे. तर एका थाळीसाठी 100 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 7 हजार 500 डॉलर रूपये मोजावे लागत आहेत. महत्त्वाचं म्हणजे दुकानदार देखील अफगाणिस्तानमधील चलानाची नाही तर डॉलरची मागणी करत आहेत. 


बातमी : http://हतबल वडिलांची व्यथा! डोळ्यादेखत 21 वर्षांच्या मुलीला घेवून गेले तालिबानी


काबुल विमानतळाबाहेर शेकडो लोक अफगाणिस्तान नागरिक देश सोडण्याची वाट पाहत आहेत. काबूल विमानतळावर पोहोचलेले लोक उपासमारीने त्रस्त आहेत. तालिबानींच्या दहशतीला घाबरून देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर जमले आहे. असे असूनही, तालिबान त्यांना मदत करण्याऐवजी त्यांना मारत आहे.
 
तर दुसरीकडे अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक या कठीण काळात अफगाणांना मदत करत आहेत. विमानतळाजवळ तात्पुरती घरे बांधून सैनिक रहिवाशांना पाण्याच्या बाटल्या आणि अन्न देत आहेत.