VIDEO । या देशात सापडला सोन्याच्या डोंगर, सोने लुटण्यासाठी लोकांची मोठी गर्दी
आता बातमी एका सोन्याच्या डोंगराची. काँगो भागात सोन्याचा डोंगर सापडला आणि स्थानिक लोकांना माहिती मिळताच सोने लुटण्यासाठी मोठी गर्दी केली.
मुंबई : जर आपल्याला अचानक आपल्या घराभोवती सोन्याचा (Gold) खजाना सापडल्याचे समजले तर, तुम्ही काय कराल? तुम्ही विचारात पडाल की, याबाबत काय करायचे, आपले सर्व काम सोडून पिशव्या घेऊन त्याच ठिकाणी धावत जाल. असाच काहीसा प्रकार आफ्रिकातील काँगोमध्ये पुढे झाला आहे. गोल्ड माउंटनची (Gold Mountain) माहिती मिळताच लोकांनी मोठी गर्दी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काँगोमध्ये सोन्याचा डोंगर
आफ्रिकेच्या काँगोमध्ये (Republic Of Congo) एक पर्वत सापडला आहे, ज्यामध्ये 60 ते 90 टक्के क्षेत्र सोने (Gold Mountain) असल्याचे सांगितले जाते. आसपासच्या ग्रामस्थांना या सोन्याच्या डोंगराची माहिती मिळताच, त्यांनी तेथे मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. सोने जमविण्यासाठी लोकांनी मोठ मोठ्या पिशव्याही सोबत घेतल्या होत्या. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत 53 हजार लोकांनी हा 28 सेकंदाचा व्हिडिओ पाहिला आहे.
आफ्रीकेच्या काँगो भागात सोन्याचा डोंगर सापडला. याचे वृत्त समजताच जोरदार चर्चा सुरु झाली. अचानक शोध लागलेल्या या सोन्याच्या डोंगराची स्थानिक लोकांना माहिती मिळताच सोने लुटण्यासाठी मोठी गर्दी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोने खोदण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या डोंगरावर 60 ते 90 टक्के सोने असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याची लूट करण्यासाठी प्रचंड गर्दी वाढल्यानंतर खाणकाम करण्यास त्वरित बंदी घालण्यात आली आहे.