वय वर्षे 100! तरुणांना लाजवेल असा Run-Up, हा Video तुम्हाला देईल प्रेरणा
व्हिडीओत एक ज्येष्ठ व्यक्ती (Senior Citizen) धावण्याच्या स्पर्धेत भाग घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तरुणांना प्रेरणा घेता येईल.
Never Give Up Inspirational Video: सोशल मीडिया म्हंटलं की व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. या प्लॅटफॉर्मवर एका पेक्षा एक सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक ज्येष्ठ व्यक्ती (Senior Citizen) धावण्याच्या स्पर्धेत भाग घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तरुणांना प्रेरणा घेता येईल. या वयातही आपण हिम्मत हारायची नसते असं स्पष्ट सांगावसं वाटतं. हा व्हिडीओ आतापर्यंत 34.4 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
व्हायरल व्हिडीओत एक ज्येष्ठ व्यक्ती जिचं वय 102 च्या घरात आहे. अशी व्यक्ती धावण्याच्या शर्यतीत भाग घेताना दिसत आहे. त्यांचा दृढ निश्चय पाहून उपस्थितांनी टाळ्या (People Clapping) वाजवून त्यांना दाद दिली. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "तुमच्या स्वप्नांना वयाचं बंधन नसतं, ही व्यक्ती 1917 जन्मला आली आहे. धावण्याऱ्या व्यक्तीचं वय 102 आहे."
41 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये प्रत्येकजण या वृद्धाच्या पुढे जाताना दिसत आहे. पण लोकांचं लक्ष शर्यतीत जिंकलेल्या स्पर्धकांकडे नसून या वृद्धाकडे होतं. या शर्यतीत वृद्ध व्यक्ती जरी शेवटच्या क्रमांकावर आली असली तरी या ज्येष्ठाने आपल्या जिद्दीने लोकांची मनं जिंकली. लाखो लोकांनी व्हिडीओला लाईक केले असून हजारो लोकांनी व्हिडीओ रिट्विट देखील केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.