जिनपिंग म्हणतात, जगातल्या महत्वाच्या मुद्दयांवर चीनची भूमिका निर्णायक
चीन जगाची महासत्ता बनू पाहातय.
बीजिंग : चीन जगाची महासत्ता बनू पाहातय.
आर्थिक ताकद
जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला चीन अधिकच आक्रमक झाला आहे. नव वर्षाच्या निमित्ताने संदेश देताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुढची दिशा स्पष्ट केली.
भावी महासत्ता
यापुढे जगातल्या महत्वाच्या विषयांमध्ये चीनची भूमिका महत्वाची आणि निर्णायक असेल. जगाला चीनचं मत लक्षात घ्यावं लागेल, असं जिनपिंग यांनी ठणकावून सांगितलं आहे.
आक्रमक चीन
त्याचबरोबर नवीन वर्षात आपला वन बेल्ट वन रोड हा महाकाय प्रोजेक्टसुद्धा धडाडीने पुढे नेण्याबाबत सूतोवाच जिनपिंग यांनी केलं. चीनच्या या प्रकल्पाबाबत भारत तसच इतर महत्वाच्या राष्ट्रांचा विरोध असूनसुद्धा चीन आपला प्रकल्प आक्रमकपणे राबवत आहे.