Airbus Hiring: सध्या सगळीकडेच नोकरकपातीचे संकट आलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चितेंचे सावट पसरले आहे. त्यातून एकामागून एक नोकरकपात (Lay off) करणाऱ्या कंपन्यांनी अद्यापही नव्या नोकरभरतीचीही प्रक्रिया सुरू केली नाही. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांनी जायचं कुठे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्यातून रोज त्याच त्याच नोकरकपातीच्या (Global Lay off) बातम्या समोर येत असताना मात्र सगळ्यांच्या मनात धाकधूक असताना आता पुन्हा एकदा मोठी नोकरीकपात होणार की काय याची भितीही अनेकांना सतावते आहे. परंतु याच नोकरकपातीच्या पार्श्वभुमीवर आता नवी नोकरभरती होण्याचे संकेत मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरबस (Airbus) या कंपनीनं नव्या नोकरभरतीची घोषणा केल्याचे समोर येते आहे यानं नोकरकपातीच्या लाटेत नवा आशेचा किरण मिळण्याची अनेकांना शक्यता आहे.  अशावेळी नक्की कोणती कंपनी मैदानात उतरली आहे हे जाणून घेण्याचीही उत्सुकता तुम्हाला लागून राहिली असेल. 


जगभरातील दिग्गज कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली जात आहे. पण अशा परिस्थितीत बेरोजगारांसाठी एअरबस (Airbus) कंपनी नवा आशेचा किरण घेऊन समोर आली आहे. एअरक्राफ्ट निर्मिती करणारी एअरबस ही युरोपियन कंपनी (European aircraft maker) 2023 वर्षात 13 हजारांहून अधिक जणांची भरती करणार आहे.


एअरबसने 26 जानेवारी रोजी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की कंपनीची यावर्षी १३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी भरती करण्याची योजना आहे. या नोकरभरतीत एअरबस कमर्शियल एअरक्राफ्ट ऑपरेशन पुढे नेण्यासाठी तसेच संरक्षण, अंतराळ आणि हेलिकॉप्टरशी संबंधित 7 हजार पदे असतील. 9 हजारांहून अधिक पदे युरोपासाठी भरली जातील आणि उर्वरित पदांची भरती जगभरातून (global network) केली जाईल.


रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, एअरबसने म्हटले आहे की 2022 मध्ये कंपनीने आधीच मोठ्या प्रमाणात भरती केली आहे. यामुळे जगभरातील कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 30 हजारांवर गेली आहे. आता नव्या भरतीत एक तृतियांश पदे पदवीधारांसाठी असतील. जगभरात होणाऱ्या या भरतीत टेक्निकल, मॅन्यफॅक्चरिंग सोबत कंपनीच्या नव्या एनर्जी, सायबर आणि डिजीटल सारख्या दीर्घकालीन व्हिजनला सपोर्ट देणाऱ्या नवीन कौशल्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


सध्या जगभरातील टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीची लाट सुरु आहे. आर्थिक मंदीच्या धास्तीने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कामावरुन काढून टाकले जात आहे. ॲमेझॉन, फेसबुक, ट्विटर, IBM, SAP आणि अन्य अनेक कंपन्यांनी यावर्षी सुमारे 67,268 लोकांना नोकरीवरुन कमी केले आहे.