मुंबई : आपल्या सगळ्यांना तर हे माहित आहे की, रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरु आहे. अनेक दिवस उलटल्यानंतर देखील हे युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीय. अनेक लोकांनी प्रयत्न करुन देखील रशिया काही मागे हटायला तयार नाही आणि युक्रेन देखील हार मानत नाहीय, ज्यामुळे हे युद्ध संपत नाहिय. या युद्धाचा परिणाम दोन्ही देशाच्या आर्थिक परिस्थीतीवरती पडला असणार हे तर सहाजिकच आहे. आता या सगळ्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्याने सगळ्यांना आश्चर्यचकित करुन सोडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी बातमी समोर येत आहे की, युद्धाच्या परिस्थीत रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ब्रिटनमधील एका वृत्तपत्राच्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. 


परंतु या युद्धाच्या वातावरणात देखील रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत कशामुळे वाढ झाली? असा प्रश्न सर्वांनाच सतावू लागला आहे.


शॉर्टेजच्या भीतीने दर वाढवले


रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले आहेत. ज्यामध्ये असे देखील म्हटले जात होते की, कंडोमचा शॉर्टेज होणार आहे, ज्यामुळे त्याच्या किंमती देखील वाढ होणार आहे. ज्यामुळे लोक बाजारात जाऊन कंडोम विकत घेऊ लागले. ज्यामुळे त्यांचा काही दिवसांचा प्रश्न तरी सुटेल.


मोठ्या कंपन्यांनी व्यवसाय सुरू ठेवला आहे


रशियातील कंडोमच्या विक्रीतील ही तेजी अशा वेळी दिसून आली आहे, जेव्हा ड्युरेक्स आणि इतर ब्रँडच्या नावाने कंडोम बनवणारी ब्रिटीश कंपनी Reckitt  देशात आपला व्यवसाय सुरू ठेवत आहे.


रशियातील सर्वात मोठ्या ऑनलाइन किरकोळ विक्रेत्या Wildberries ने म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यात कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


देशातील सर्वात मोठी फार्मसी चेन 36.6 PJSC ने विक्रीत 26 टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. RBC च्या अहवालानुसार केमिस्टकडून कंडोमची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, सुपरमार्केटने म्हटले आहे की, त्यांची विक्री 30 टक्क्यांनी वाढली आहे.