मुंबई : तुम्ही प्रेमात फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. ज्यामध्ये बहुतेकवेळा पैशासाठी, तर कधी एखाद्यावरील रागामुळे फसवणूक केली जाते. परंतु युकेमधून एक असं प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल. इथे एका व्यक्तीने एकाच वेळेस तीन महिलांची फसवणूक केली आणि त्यांच्याशी लैंगिक संबंध देखील ठेवले. परंतु यानंतर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो आता तुरुंगाची हवा खात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हाला देखील या प्रकरणाबद्दल जाणून घेतल्यानंतर नक्की काय झालं असेल हे जाणून घ्यायचं असेल.


खरंतर तीन महिलांची फसवणूक करणारी ही व्यक्ती ट्रांसजेंडर आहे. त्याने खोट्या लिंगाचा वापर करुन या महिलांसोबत संबंध ठेवले. रात्रीच्या अंधारात महिलांना देखील आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले नाही. परंतु सत्य समोर आल्यानंतर या व्यक्तीला 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.


एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, 32 वर्षीय तरजीत सिंग, ज्याचा जन्म महिलेच्या रूपात झाला होता त्यावेळी त्याचं नाव हन्ना वॉल्टर्स होतं.  परंतु तो ट्रान्सजेंडर असल्यामुळे त्याला नंतर पुरुषाच्या रुपात ओळखले गेले. तरजीतने 2010 ते 2016 दरम्यान तीन वेगवेगळ्या महिलांसोबत सेक्स केले होते. रात्रीच्या अंधारात तो बनावट लिंग वापरत असे. यासोबतच तो मुलांसारखा पेहराव करत असे. त्याच्या शैलीमुळे महिलांनी त्याच्यावर कधीच संशय घेतला नाही.


ताराजीतची सत्यता समजल्यावर त्या महिलांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या पीडितांमध्ये एका 16 वर्षीय तरुणीचाही समावेश आहे. महिलांच्या विनंतीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. स्नेरेस्ब्रुक क्राउन कोर्टात खटल्यानंतर, त्याने जीवे मारण्याच्या धमक्या, हल्ला आणि असभ्य वर्तनासाठी दोषी असल्याचे कबूल केले.


या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश ऑस्कर डेल फॅब्रो यांनी सांगितले की, आरोपीने फसवणूक करून तिन्ही महिलांशी संबंध ठेवले होते. यासोबतच महिलांनाही मारहाण करण्यात आली. आपल्या निकालात न्यायाधीश म्हणाले की, आरोपीने महिलांना बनावट लिंगाचे सत्य सांगायला हवे होते, परंतु त्याऐवजी फसवणुकीचा मार्ग निवडला. यानंतर न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तिन्ही महिलांनी साक्ष दिली आहे.