वॉशिंग्टन : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओढावणारी नामुष्की टळली आहे. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांशी बातचित करणार होते. यावेळी पत्रकारांशी बोलण्यासाठी तयार करण्यात आलेले कागद हवेमुळे उडून गेले. यावेळी डोव्हाल यांनी उडालेले सगळी कागदपत्र एकत्र करून मोदींना दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील ११ महत्त्वाचे मुद्दे


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरं गेले. या दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच भेट होती. या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.


ट्रम्प काय म्हणाले?


१ भारत आणि अमेरिकेचे संबंध हे याआधी एवढे मजबूत आणि चांगले नव्हते


२ भारत जगातली सगळ्यात जलद वाढणारी अर्थव्यवस्था आहे. याबाबतीत आम्ही लवकरच तुमच्या स्तरावर पोहोचू


३ भारतामध्ये अमेरिकेच्या उत्पादनांवर असलेले निर्यातीचे निर्बंध हटवले जावेत आणि व्यापारमध्ये होत असलेला तोटा कमी करण्यात यावा


४ भारत आणि अमेरिका दहशतवादामुळे प्रभावित झाले आहेत. भारताबरोबर सुरक्षा भागीदारी महत्त्वाची आहे. आम्ही इस्लामी दहशतवादाचा खात्मा करू


मोदी काय म्हणाले?


५ अमेरिका दौरा आणि ट्रम्प यांच्याबरोबरची पत्रकार परिषद भारत-अमेरिका संबंधांमधल्या इतिहासामधील एक महत्त्वाचं पान आहे. हा दौरा प्रत्येक बाबतीत महत्वपूर्ण आहे.


६ दहशतवादाविरोधातली लढाई आमच्यासाठी प्राथमिकता आहे.


७ दहशतवादाबद्दल आमच्यामध्ये चर्चा झाली आणि त्याविरोधात सहयोग करण्यासाठी दोन्ही देशांची सहमती झाली. दहशतवाद आणि त्यांच्यासाठी असलेल्या सुरक्षित ठिकाणांविरोधात लढणं हा आमच्या सहयोगाचा महत्वपूर्ण हिस्सा आहे.


८ भारत- प्रशां महासागर क्षेत्रात शांती, स्थिरता आणि सुरक्षितता स्थापन करणं हे आमच्या केंद्रस्थानी असणार आहे.


९ अफगाणिस्तानमध्ये वाढणारी अस्थिरता आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. आम्ही अमेरिकेसोबत या विषयावर समन्वय स्थापन करत आहोत.


१० सुरक्षेसाठी आमचा वाढता सहयोग महत्त्वपूर्ण आहे.


११ व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणूक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. तंत्रज्ञान, नवीन उपक्रम आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था ही अशी क्षेत्र आहेत ज्यावर आपण लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.