अलास्का: रस्ते दुभंगले आणि गाड्या खचल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अंगावर एक क्षण काटा उभा राहातो. भूकंपाच्या तीव्र झटक्याने हादरलेल्या शहरातील ही अवस्था असल्याचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 75 वर्षांत चौथ्यांदा असा तीव्र भूकंप या शहरात झाला आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अलास्का इथे गुरुवारी 8.2 तीव्र भूकंपाचे झटके बसले आहेत. अमेरिकेच्या बेटापर्यंत त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 75 वर्षात चौथ्यांदा एवढा मोठा भूकंप आल्याचं सांगितलं जात आहे. हे फोटो पाहून अंगावर काटा येईल. यामध्ये अजून कोणती जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी मिळू शकली नाही.  


पेरिविलेपासून 91 किलोमीटर दूर अंतरावर 8.2 तीव्र भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप येण्याआधी 6.2 आणि 5.6 तीव्र भूकंपाचे दोन धक्के बसले होते. त्यानंतर मोठा भूकंपाचा धक्का बसला आहे. हे भूकंपाचे धक्के किती तीव्र आहेत याचा अंदाज व्हिडीओ पाहूनही तुम्हाला येऊ शकतो.




सर्वात पहिल्यांदा 1965 मध्ये एवढा तीव्र भूकंपाचा धक्का अलास्काला बसला होता. त्याची तीव्रता 8.7 एवढी होती. त्यावेळी 10.7 मीटर उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या असंही काहीजणांचं म्हणणं होतं. 1957 मध्ये 8.6 तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपानंतर 200 वर्षांपूर्वीचा ज्वालामुखी पुन्हा अॅक्टिव्ह झाला असंही जाणकार सांगतात. त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या 24 तासात भूकंपाचे धक्के बसले होते. 


 


अलास्कातील आज बसलेले भूकंपाचे धक्के हे 75 वर्षांत चौथ्यांदा एवढ्या मोठ्य़ा प्रमाणात तीव्र धक्के बसले आहेत. तर ट्विटरवर काही युझर्सनी 482 किलोमीटर दूर अंतरावर 40 फूट उंचीच्या त्सुनामीच्या लाटा आल्याचं सांगत आहेत. यासंदर्भात अद्याप यूएसजीएसने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र या भूकंपामुळे नागकरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.