Scientific Facts of Alcohol : तुम्ही अनेक मद्यपींना नशेच्या अवस्थेत अनेक नाटकं करताना पाहिलं असेल. दारू प्यायल्यानंतर लोक अनेकदा इंग्रजी बोलू लागतात, असेही पाहायला मिळाले आहे. दारु प्यायल्यानंतर इंग्रजी बोलता येत नसणारेही ते बोलण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी दारू पिणाऱ्यांचे इंग्रजी ऐकून हसू आवरत नाही. तुम्ही अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये अशी दृश्ये पाहिली असतील, ज्यामध्ये लोक दारु पितात आणि इंग्रजीत बोलतात. पण असे का होते? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दारुमध्ये असे काय असते की लोक इंग्रजी बोलू लागतात? यावर बरेच संशोधन झाले आहे. 'जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजी' या सायन्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, दारु पिण्यामुळे निर्माण होणारी नशा दुसरी भाषा बोलण्यात मदत करते, तसेच आत्मविश्वासही वाढतते.


या संशोधनात जवळपास 50 जर्मन लोकांचा समावेश करण्यात आला होता. हे लोक डच भाषा शिकले होते आणि नेदरलँडमध्ये अभ्यास करत होते. भाषा ही आपल्या वर्तनाची पद्धत आहे, असे या संशोधनात म्हटले आहे. दारू प्यायल्यानंतर आपल्या वागण्यात बदल होतो.


नशेत असलेल्या लोकांना दारू प्यायल्यानंतर भान राहत नाही आणि अशा परिस्थितीत त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. मद्यपी आपल्या मनातील आत्मविश्वासाने बोलतात. इंग्रजी ही त्यांची मातृभाषा नसते, अशा परिस्थितीत लोक चुकीचे बोलू नयेत म्हणून ती बोलण्यास कचरतात. अशा परिस्थितीत दारूमुळे नवीन भाषा बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो. नशेत असलेले लोक न घाबरता इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात.


संशोधनातून काय समोर आलं?


हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी एक भन्नाट पद्धत अवलंबली. संशोधनादरम्यान यातील काही लोकांना दारू देण्यात आली. त्याच वेळी, काही लो?कांना सामान्य पेय दिले गेले, ज्यामध्ये मद्य नव्हते. यानंतर दोन्ही प्रकारच्या लोकांना डचमध्ये बोलण्यास सांगण्यात आले. दारू पिणारे लोक बिनदिक्कतपणे डच बोलत होते. त्याच वेळी, जे सामान्य पेय पीत होते त्यांना डच बोलण्यास संकोच वाटत होता.