Women Alcohol Consumption: दारू पिणाऱ्यांची संख्या पाहिली तर त्यात सगळ्यात जास्त पुरुष असतात, असे म्हटले जाते. पण आता हे सगळं खूप वर्षांपूर्वीच्या चर्चा आहेत. आता अशी माहिती समोर आली आहे की महिलांनी यातही पुरुषांना मागे टाकलं आहे. 90 च्या दशकात आणि त्यानंतर जन्मलेल्या महिला या सगळ्याच बाबतीत पुढे आहेत. मग तो फॅशन गेम असो किंवा मग करिअरमध्ये सगळ्यात महिला या अव्वल स्थानी आहेत. पण या धावत्या जगात महिला या काही वाईट सवयींनमध्ये देखील पुढ गेल्या आहेत. स्त्रिया आता पुरुषांच्या बरोबरीने दारू पितात आणि दारू पिण्याच्या शर्यतीत पुरुषांनाही मागे टाकत आहेत. मात्र, फॅशनेबल आणि आधुनिक बनण्याच्या नादात महिलांना दारूचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. यूएस सरकारच्या आकडेवारीनुसार, 2000 ते 2015 दरम्यान, 45 ते 64 वयोगटातील महिलांमध्ये सिरोसिस मृत्यूचे प्रमाण 57% वाढले. त्याच वयोगटातील पुरुषांमध्ये 21% घट झाली आहे. या व्यतिरिक्त, 25 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये सिरोसिस मृत्यूमध्ये 18% वाढ झाली आहे,


पुरुषांपेक्षा महिलासांसाठी आहे  धोक्याची घंटा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समस्या ही नाही की स्त्रिया जास्त दारू पितात, दारूचा त्यांच्या शरीरावर  पुरुषांपेक्षा जास्त आणि वेगळ्या प्रकारे परिणाम होतो. हि जास्त चिंतेची बाब आहे.  शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, स्त्रियांच्या शरीरात अल्कोहोल डिहायड्रोजनेज (ADH) एन्झाइमची अत्यंत मर्यादित प्रमाणात उत्सर्जन होते, जे यकृतामध्ये असते आणि ते शरीरातील अल्कोहोल तोडण्याचे काम करते. 


याचे कारण काय असू शकते? 


डॉन शुगरमन, हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसशास्त्राचे प्राध्यापक आणि मॅसेच्युसेट्सच्या मॅक्लीन हॉस्पिटलमधील व्यसनमुक्ती मानसशास्त्रज्ञ म्हणतात, "मद्यपान करणाऱ्या पुरुषांपेक्षा महिलांवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. शास्त्रज्ञांप्रमाणे, महिलांमध्ये काही ठरावीक प्रमाणात मद्यपानानं डिहायड्रेशन होते आणि लिव्हरमध्ये साठते आणि त्याच्या मदतीनं अल्कोहोल तुलनेत राहते. 


हेही वाचा : तुमच्याही हाताचे कोपरे झाले आहेत काळे, मग आजच करा 'हे' घरगुती उपाय


ज्या महिला जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांना मद्यपान आणि अनेक समस्यांचा धोका जास्त असतो. याला "टेलिस्कोपिंग" म्हणतात. म्हणजेच, जागतिक स्तरावर स्त्रिया पुरुषांपेक्षा उशिराने दारू पिण्यास सुरुवात करतात, परंतु त्यांना लगेच सवय लागते. याशिवाय, महिलांना यकृत आणि हृदयाच्या समस्यांचाही धोका जास्त असतो.


महिलांमध्ये दारू पिण्याचे इतर तोटे काय आहेत जाणून घेऊया...


मेंदूवर परिणाम :  स्त्रियांच्या मेंदूवर अल्कोहोलचा परिणाम पुरुषांपेक्षा जास्त असतो.


यकृत रोग (लिव्हर डॅमेज) : पुरुषांपेक्षा स्त्रियांना सिरोसिस आणि इतर अल्कोहोल-संबंधित रोगांचा धोका जास्त असतो.


हृदयावर परिणाम : ज्या महिला जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांना हृदयविकाराचा धोका पुरुषांपेक्षा जास्त असतो.


स्तनाचा कर्करोग: अल्कोहोलचे प्रमाण वाढल्याने तोंड, घसा, अन्ननलिका आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. महिलांमध्ये, अगदी कमी प्रमाणात मद्यपान केल्याने स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)