अंतराळातून पृथ्वीवर फैलावतोय एलियन व्हायरस; मानवासाठी अत्यंत धोकादायक?
एलियन व्हायरस व्हायरस बाबात कोणताही ठोस दावा करण्यात आलेला नाही. मात्र, खोल समुद्र तसेच डोंगर रांगांममधील निर्मनुष्य ठिकाणी व्हिब्रिओ व्हल्निफिकस नावाचा बॅक्टेरिया सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Rare Alien Like Viruses : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग दहशतीत होते. जग आता कुठे कोरोना व्हायरसपासून सावरले असतानाच आता एलियन व्हायरस आणि बॅक्टेरिया चर्चेत आला आहे. हा एलियन व्हायरस मानवासाठी अत्यंत धोकादायक असून तो शरीरातील मांस खात असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेत तिघांचा मृत्यू
अमेरिकेत व्हिब्रिओ व्हल्निफिकस नावाच्या बॅक्टेरियामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन लोकांना समुद्रात पोहल्यानंतर
या बॅक्टेरिया संसर्ग झाला होता. तर, तिसऱ्या मृत व्यक्तीने कच्चे सीफूड खाल्ले होते. संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांत यांचा मृत्यू झाल्यामुळे जेथे हे मृत्यू झाले तेथे समुद्रात पोहणे आणि समुद्री खाद्यपदार्था खाण्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला.
जीवघेणा संसर्ग
या बॅक्टेरियाला नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस असेही म्हणतात. शरीरावर जखम झाली असेल त्या जखमेतून हा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो आणि मग संपूर्ण शरीर पोखरुन काढतो. हा बॅक्टेरिया शरीरातील मांस खातो. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार हे मिठाच्या पाण्यात आढळणारे बॅक्टेरिया आहेत. ज्यांना याचा संसर्ग होतो त्यांच्या जगण्याची शक्यता फारच कमी असते.
याला एलियन व्हायरस का म्हणतात?
स्पॅनिश पर्वतरांगांमधील सिएरा नेवाडा येथे संशोधनादरम्यान अशा प्रकारचे व्हायरस आढळून आले होते. या संशोधनात कॅनडा, स्पेन आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा समावेश होता. सॅन दिएगो विद्यापीठातही सहभागी झाले होते. पर्वतांच्या प्रत्येक चौरस मीटरवर 800 दशलक्ष विषाणू दिसले होते. उंच आणि निर्मनुष्य पर्वतरांगांमध्ये अशा प्रकारचे व्हायरस सापडल्याने संशोधक हैराण झाले. यामुळे हा व्हायरस अवकाशातून फैलावत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याला पॅनस्पर्मिया म्हणतात. संपूर्ण अवकाशात जीवसृष्टी आहे. अवकाशातील धूळ, लघुग्रह, धूमकेतू यांच्या माध्यमातून इकडून तिकडे पसरत राहते. यामुळेच हा एलियन व्हायरस पृथ्वीर आल्याचा काही संशोधकांचा दावा आहे.
एलियन व्हायरस पृथ्वीवर कसा पोहचला
पॅनस्पर्मियाच्या या सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांचा विश्वास नाही. मात्र, याबाबत अनेक दावे केले जातात. 2020 मध्ये, मल्टीडिसिप्लिनरी जर्नल ऑफ मायक्रोबियल इकोलॉजी ऑफ नेचर कम्युनिकेशन्सने एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. त्यात अशा प्रकारचे दावे आहेत. उंच पर्वतांच्या प्रत्येक लहान भागावर लाखो व्हायरस आहेक. एलियन व्हायरस पृथ्वीवर आल्यानंतर अटलांटिक महासागरात पोहचले यानंतर ते सहारा वाळवंटातून पर्वतरांगामध्ये पोहचल्याचा दावा शोधनिबंधात करण्यात आला आहे. मात्र, हा एलियन व्हायरस पृथ्वीवरील मानवासाठी किती धोकादायक हे याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा करण्यात आलेला नाही.