Aliens : एलियन्स खरचं अस्तित्तवात आहते की एलियन्स ही नुसतीच कल्पना आहे यावरुन नेमहीच वाद विवाद होत असतात. यावर संशोधक सातत्याने संशोधन देखील करत आहेत. मात्र, एसियन्सच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत अशातच नासाच्या माी संशोधकाने एलियनच्या अस्तित्वाबाबत अत्यंक खळबजनक दावा केला आहे. समुद्राच्या तळाशी  Aliens चे वास्तव असल्याचा दावा या संशोधकाने केला आहे.


एलियनबाबत अनेक चित्र विचित्र दावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलियन्सबद्दल अनेक चित्र विचित्र दावे केले जातात. रहस्यमयी यूएफओचे दिसल्याचा दावा अनेकदा केला जातो. एलियन पृथ्वीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा देखील करण्यात केला आहे. ब्रिटनमध्ये 2.5 वर्षांत सुमारे 1000 यूएफओ दिसले आहेत. पृथ्वी संपर्क होवू नये यासाठी एलियन्स सूर्यमालेच्या अगदी बाहेर गडद ठिकाणी लपलेले असू शकतात असा दावा एका संशोधकाने केला होता. आता नासाच्या एका माजी संशोधकाने अनोखा दावा केला आहे.


समुद्राच्या तळाशी असू शकतात एलियन


समुद्राच्या तळाशी UFO पायलट तसेच एलियन असू शकतात. केविन नुथ यांनी हा दावा केला आहे.  2001 ते 2005 या काळात केविन नुथ यांनी नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये काम केले आहे.  एलियन्स पृथ्वीच्या पृष्ठभागावर न राहता पाण्याखाली राहून आपल्यावर लक्ष ठेवत असतील अशी शक्यता केविन नुथ यांनी वर्तवली आहे.


समुद्र सुरक्षित जागा


समुद्र हे एलियन्ससाठी सर्वात सुरक्षित जागा वाटत असणार. समुद्राच्या तळाशी एलियन्सने आपला बेस कॅम्प उभारला असावा. थिअरी ऑफ एव्हरीथिंग पॉडकास्टमध्ये केविन नुथ यांनी हा दावा केला. 'पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 75% भाग हा पाण्याने व्यापला आहे. प्रत्यक्षात मानव या पाण्याच्या सर्व स्त्रोतापर्यंत अर्थात समुद्राचे तळ गाठू शकलेले नाही. यामुळे एलियन लपण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण  वाटत असावे. अनेकदा UFO  हे समुद्राच्या वर फिरताना दिसले आहेत. यामुळेच खोल समुद्रातून बाहेरच्या वातावरणात हे एलियन भ्रमण करत असावेत 


एलियन जमीनीवर राहूच शकत नाहीत


एलियन हे परग्रहवासी आहेत. यामुळे पृथ्वीवरील वाातावरण आणि पृथ्वीवरील जमीनीवर एलियन राहूच शकत नाहीत. एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाताना तापामानात प्रचंड तफावत पहायला मिळते. मंगळ ग्रहाचे उदाहरण घेतले असता मंगळ ग्रहावर तापमान शून्य फॅरेनहाइटपेक्षा 100 अंश खाली असते. शुक्र ग्रहावर तापमान 800 डिग्री फॅरेनहाइट असते.  शुक्र  ग्रहावरील वातावरण आपल्यापेक्षा सुमारे 100 पट घन आहे, तर मंगळावरील हवा सुमारे 100 पट पातळ आहे.  महासागराचे तापमान 32 डिग्री फॅरेनहाइट आणि 212 डिग्री फॅरेनहाइट दरम्यान असते. त्यामुळे समुद्रातून महासागरात, एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाताना तापमानात फारसा बदल जाणवत नाही. यामुळे एलियन समुद्राच्या तळाशी राहतात असा दावा संशोधकाने केला आहे.