लंडन : प्रत्यार्पण प्रकरणी सुरू असलेल्या सुनवाईदरम्यान विजय मल्याने भलतीच प्रतिक्रीया दिली आहे. भारतात माझ्या जीवाला धोका असल्याचे विजय मल्ल्याने म्हटले आहे. यूकेच्या विस्टमिन्स्टर कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावनीदरम्यान मल्ल्याच्या विकीलाने हा मुद्दा मांडला.


'माझ्यावरील सर्व आरोप निराधार'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय मल्ल्याने वकिलाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या नव्या मुद्द्यामुळे भारतीय यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागली आहे. विजय मल्ल्याच्या जीवीताला भारतात कोणताही धोका नाही, हे भारत दाखवून देणार आहे. आपल्यार केले जाणारे सर्व आरोप हे खोटे आणि निराधार असल्याचेही विजय मल्ल्या याने म्हटले आहे.


'भारतातील सर्व कारागृहं खराब'


 भारतातील सर्व कारागृहं खराब असल्याचे विजय मल्ल्याने यापूर्वीच म्हटले आहे. दरम्यान भारताने यूके ऑथॉरिटीजला विश्वास दिला आहे की, मल्ल्याला मुंबईतील ऑर्थर रोडवरील कारागृहात ठेवण्यात येईल. तसेच, मल्ल्याला कारागृहातील ज्या बरॅकमध्ये ठेवले जाईल, त्या बरॅकीची छायाचित्रेही भारताने यूके ऑथॉरिटीजला पाठवली असल्याचे समजते.


सुनावनीच्या तारखाही ठरल्या


मल्याचा दावा खोटा ठरविण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणी सुनावनीच्या तारखाही ठरल्या असून, पुढील सुनावनी 4, 5, 6, 7, 11, 12, 13 आणि 14 डिसेंबरला करण्यात येणार आहे.


विजय मल्ल्यावर काय आहे आरोप?


विजय मल्ल्यावर देशातील अनेक सरकारी बॅंकांचे सुमारे 9000 कोटी रूपायंचे कर्ज थकवल्याचा आरोप आहे. या आरोपावरूनच मल्ल्यावर विश्वासघात आणि फसवणूकीबाबत खटला सुरू आहे. मल्ल्याने 2 मार्च 2016ला भारतातून पलायन केले. तेव्हापासून तो इंग्लंडमध्ये राहात आहे.