रबत : शेतीप्रधान देश असलेल्या मोरोक्कोमध्ये सध्या पाण्याचा तुटवडा आहे.
उन्हाळा संपल्यापासून तिथे अत्यल्प पाउस पडलेला आहे. 


राजे मोहम्मद (चौथे) यांचं आवाहन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोरोक्को मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. परंतु या वर्षी मोरोक्कोत फारच कमी पाउस पडलेला आहे. त्यामुळे तिथे चिंतेचं वातावरण आहे. यामुळंच मोरोक्कोचे राजे मोहम्मद (चौथे) यांनी चांगला पाउस पडावा म्हणून देशातल्या सर्व मशिदींमध्ये प्रार्थना करायला सांगितलं आहे. 


मोरोक्कोतील हवामानबदल


मोरोक्को विद्यापीठाच्या अभ्यासानुसार १९६० सालापासून आतापर्यंत तापमानात ४ डिग्री सेल्सिअसने वाढ झालेली आहे. पर्जन्यवृष्टीतही सातत्याने घसरण होते आहे. भूजलाच्या पातळी खाली गेली आहे. 


मोरोक्कोसमोरील आव्हान


दुष्काळामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली आहे. मोरोक्कोची लोकसंख्या ३५ लाख आहे. यावर्षी अन्नधान्याची आयात करण्याची वेळसुद्धा मोरोक्कोवर येऊ शकते. मोरोक्कोची ४० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीचा जीडीपीमधला वाटा १५ टक्के आहे. त्यामुळेच नजिकच्या काळात जर चांगला पाउस पडला नाही तर मोरोक्कोला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे.